अजय दुधाणे, अंबरनाथ प्रितिनिधी
NCP Leader Booked for Molestation in Ambernath : अंबरनाथमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून एका महिलेचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. इम्रान खान असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ नगरपालिकेबाहेर घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. इम्रान खानं यानं महिलेला नको तिथे हात लावला. त्याशिवाय चलती है क्या, कितना लेगी? यासारख्या शब्दांचा वापर केला, असे तक्रारीत म्हटले आहे.
इम्रान खान याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. अंबरनाथमध्ये राहणारी एक महिला कामानिमित्त नगरपालिकेत गेली होती. त्यावेळी तिथे इम्रान खान याने आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तसंच चलती है क्या? कितना लेगी? असं विचारून मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी इम्रान खान यांच्याकडून याबाबत अध्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर मंगळवारी एका महिलेने विनयभंगाचा गंभीर आरोप केला आहे. अंबरनाथ नगरपालिकेबाहेर घडलेल्या या घटनेनंतर इम्रान खान नावाच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, ती कामानिमित्त नगरपालिकेत गेली असताना इम्रान खान याने तिच्याशी गैरवर्तन केले. “चलती है क्या? कितना लेगी?” असे आक्षेपार्ह वाक्य बोलून त्याने तिला अयोग्यरित्या स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोप तिने केला आहे. यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार नोंदवली, ज्यावरून इम्रान खानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी इम्रान खानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तक्रारदार महिलेने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.