Hasan Mushrif
Hasan Mushrif  Saam TV
महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Raid: मुलाबाळांना नाहक त्रास दिला जातोय, हे योग्य नाही; हसन मुश्रीफ यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरी तसेच सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर ईडीने आज धाड टाकली. ईडीने धाड टाकलेल्या कारखान्याशी माझी काहीही संबंध नाही. साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पैशातून उभारण्यात आला आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. (Hasan Mushrif)

चंद्रकांत गायकवाड माझे मित्र आहेत. मात्र व्यावसायिकदृष्ट्या त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. मात्र तरीही संशय असेल तर सत्ता तुमची आहे. सगळी यंत्रणा तुमच्या हातात आहे,. चौकशी करा, असं थेट प्रत्युत्तर हसन मुश्रीफांना आजच्या कारवाईवर दिलं आहे.

जावयाचा आणि कंपनीचा आता काहीही संबंध नाही

2020 मध्ये आप्पासाहेब नलावडे साखर कारखाना ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला चालवण्यासाठी दिला होता. मात्र आता ही कंपनी तो कारखाना चालवत नाही. त्यामुळे जावयाचा आणि कंपनीचा आता काहीही संबंध नाहीत. त्यामुळे जावयावर जे काही आरोप आहेत ते खोटे आहेत. (Latest Marathi News)

नोटीस न देता कारवाई

कोणतीही नोटीस न देता ईडीने छापे टाकले आहेत. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आधीचेच आहेत, जे खोटे आहेत. यापूर्वीच्या छाप्यातून काहीच निष्पन्न झालेलं नाही असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

कुटुंबियांना विनाकारण त्रास दिला जातो

ईडीच्या छाप्याचं कारण माहित नाही. या कारवाईंची कुटुंबियांना नाहक त्रास दिला जातो.मुलीच्या घरी चौकशी गेली. मुलाबाळांना त्रास देणे हे योग्य नाही. राजकारणासाठी असं करणे चुकीचं आहे. समन्स पाठवा, बोलवा, मुलाबाळांना नाहक त्रास देणं चुकीचं आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

Suresh Raina: सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तींचे अपघातात निधन

Today's Marathi News Live : कराडमध्ये केमिकल गॅसच्या टँकरला गळती

SCROLL FOR NEXT