MVA News: महाविकास आघाडीमध्ये फूट? शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी

उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख
MVA
MVASaam TV
Published On

Nagpur News : विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झालीय. कारण महाविकास आघाडीतील शिक्षक भरती पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनही आपला उमेदवार उभा केलाय. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

MVA
Hingoli Bus Accident : कळमनुरी आगाराची 28 प्रवासी घेऊन जाणार बस उलटली, अनेक जण जखमी

मात्र, अद्याप काँग्रेस ने अजून आपलं समर्थन किंवा उमेदवार जाहीर केला नाहीय. तिकडे भाजपची 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहे. राज्यातील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दोन जागा काँग्रेस आणि दोन जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आल्या आहेत. नागपूरच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय.

मात्र, आता शिक्षक सेनेनं उमेदवार देऊन काँग्रेस पुढं आव्हान उभं केलंय. शिक्षक सेनेकडून गंगाधर नाकाडे यांना उमेदवार जाहीर केलीय. वरिष्ठांच्या सूचनेवरून आपली निवडणूक रिंगणात असून राष्ट्रवादीने आपल्याला समर्थन दिलंय, असा दावा नाकाडे यांनी केलाय.

MVA
Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या घरावर ईडीची छापेमारी; राजकीय वर्तुळात खळबळ

तसंच काँग्रेसनही समर्थन जाहीर करून नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडावी असं आवाहनही त्यांनी केलंय. मात्र, सेनेच्या उमेदवारामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याचं दिसतंय. याचा फायदा भाजप समर्थित उमेदवाराला होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निर्णयानुसार 30 जानेवारी 2023 ला मतदान होणार आहे. तर, 2 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com