Eknath Shinde latest News
Eknath Shinde latest News Saam TV
महाराष्ट्र

Eknath Khadse : राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? राष्ट्रवादीचा बडा नेता आठवडाभरापासून नॉट रिचेबल!

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : एकीकडे खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना, दुसरीकडे एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाथाभाऊ अचानक नॉट रिचेबल झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादीचे दिग्गज नेते म्हणून ओळख आहे. ते नेहमी आक्रमकपणे भूमिका मांडत असतात. खडसे हे कधी माध्यमांपासून दूर राहत नाही. अनेकदा ते राज्यातील राजकीय परिस्थितीवर आपली भूमिका मांडत असतात. मात्र, गेल्या ८ दिवसांपासून ते नॉटरिचेबल असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, मध्यंतरी एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा रंगली होती. खडसे यांनी आपली सून रक्षा खडसे यांच्यासह भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेटही घेतली होती. मात्र, ही भेट खासगी असल्याचं कारण सांगत खडसेंनी भाजप प्रवेशाची चर्चा खोडून काढली होती.

एकनाथ खडसे हे भाजपमध्ये असताना २०१६ साली त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्यावर खोटे आरोप केल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. तेव्हापासून गिरीश महाजन एकनाथ खडसे यांच्यातील वाद आणखीच उफाळून आले.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षातही त्यांना फार मोठी संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पक्षातही ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे आठवडाभरापासून नॉट रिचेबल असल्याने त्यांच्या मनात सध्या चाललंय तरी काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

Shirur LokSabha Election: शिरूरमध्ये अजितदादांची फिल्डिंग की पवारांचं होल्डिंग?; दोन्ही पवारांचा शिरूरकडे मोर्चा

Nagpur Crime: पत्नीने दिला थंड भात, नवऱ्याला आला संताप अन् लावला गळाला फास; पण..

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT