Eknath Khadse Saam Tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटातील १७ आमदारांवर निलंबनाची कारवाई होणार ? एकनाथ खडसे म्हणाले...

भाजपने आजच स्पष्ट केलंय की आमचा एकनाथ शिंदें यांच्या बंडात सहभाग नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील बंडखोर १७ आमदारांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केलीय. यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे (Eknath Khadse) आमदार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदारांचं निलंबन हा किचकट आणि जिकरीचा विषय आहे. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील, असं खडसे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

खडसे माध्यमांशी बोलताना पुढे म्हणाले, मी विधान भवनात आमदार झाल्याचं प्रमाण पत्र घेण्यासाठी आलो होतो. १७ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा उपाध्यक्ष अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतील.आमदारांच निलंबन हा किचकट आणि जिकिरीचा विषय आहे. ज्या लोकांनी सह्या केल्यात,त्यांचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. नारायण राणे यांच्यावेळी सर्व आमदारांना विधानभवनात बोलवून व्हेरिफिकेशन करण्यात आले. त्यांच्याकडून एफेडेविट करून घेतलं होतं. भाजपने आजच स्पष्ट केलंय की आमचा शिंदेंच्या बंडात सहभाग नाही, त्यावर विश्वास ठेवायला हवा.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करुन त्यांच्यासोबत शिवसेनेच ४० आणि अपक्ष दहा आमदार असल्याचा दावा नुकताच केला आहे. शिंदे गटाकडून बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेत मोठी खिंडार पडली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्या राजकीय संघर्ष सुरु असून महाविकास आघाडी सरकारलाही याचा मोठा फटका बसला आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

viral video : धावत्या बसमध्ये चालकाला हार्ट अटॅक, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Election : महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस? प्रचारसभेत अमित शाहांचे संकेत

Weather Forecast : उन्हाचा तडाखा की थंडीचा कडाका? वाचा राज्याचा आजचा हवामानाचा अंदाज

Horoscope Today : सावधान! दिवसभरात खर्चाचे प्रमाण वाढते राहणार ; तुमच्या नशिबात आज काय लिहिलं?

IND vs SA 1st T20I: नाद करा पण आमचा कुठं! वर्ल्ड चॅम्पियन भारताचा दक्षिण आफ्रिकेला दणका

SCROLL FOR NEXT