एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला कोणाचा पाठिंबा हे जगजाहीर झालं,पण...; नितीन राऊतांना शंका

त्यांना कुणाचा पाठिंबा त्यांना आहे हे जग जाहीर झालं आहे.आता पडद्यामागे जो कोणी आहे, त्या पडद्यामागच्या व्यक्तीला शोधणे हे महत्त्वाचं आहे, असे मत उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केले आहे.
Eknath Shinde And nitin raut
Eknath Shinde And nitin rautsaam tv
Published On

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गटात उभी फूट पडली आहे. त्यामुळे महाविकास कोसळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'एकनाथ शिंदे हे जे शक्तिप्रदर्शन करीत आहेत, ते कोणाच्या इशार्‍यावर करीत आहेत आणि कुणाचा पाठिंबा त्यांना आहे हे जग जाहीर झालं आहे.आता पडद्यामागे जो कोणी आहे, त्या पडद्यामागच्या व्यक्तीला शोधणे हे महत्त्वाचं आहे, असे मत उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी व्यक्त केले आहे. ( Ekanath Shinde Latest news In Marathi )

Eknath Shinde And nitin raut
एकनाथ शिंदे गुवाहाटीत परतले, कामाख्य मंदिरात देवाकडे केली प्रार्थना

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत ५० आमदार असल्याचा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार टिकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या राजकीय घडामोडीवर काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन राऊत पुढे म्हणाले, 'काँग्रेसमुळे कुण्या आमदाराचं नुकसान झालं हे मला तरी वाटत नाही. आम्ही त्या प्रवृत्तीचे नाहीत. आम्ही जो कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर केला होता,त्या माध्यमातून आम्ही कामं केली. अशा या परिस्थितीमध्ये या घडामोडी घडत आहेत. अजूनही जी कामे शिल्लक आहेत. ती करायवयाची होती. कारण ती कमिटमेंट आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये केली होती'.

Eknath Shinde And nitin raut
"आघाडी अनैसर्गिक होती, हे तर होणारच होतं"; शिंदेंच्या बंडखोरीबाबत उदयनराजेंचा मविआला टोला

महाविकास आघाडीच्या सरकारवरही राऊत यांनी भाष्य केलं. 'अनैसर्गित आणि नैसर्गिक काय असते?, जी युती झाली होती नैसर्गिकच होती. नैसर्गिक नसती तर सत्ता स्थापनेचा प्रश्नच उरला नसता.भाजपाचे हिंदुत्व हे मनुवादी आहे आणि शिवसेनेचे हिंदुत्व ही बहुजनवादी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांची संख्या वाढली असे कसे म्हणता येईल. मुख्यमंत्र्यांना भेटून जे आमदार गेले, ते गुवाहाटीमध्ये त्यांचा निरोप घेऊन गेले असतील. काल भेटून गेलेले शिवसैनिक आज गुवाहाटीमध्ये त्यांचा निरोप घेऊन गेले असतील', असेही नितीन राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com