मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसोबत बंडाचे निशाण फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ आलं आहे. शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाश शिंदे दोन तासांपासून नॉट रिचेबल असून दिल्लीकडे (Delhi) रवाना झाली चर्चा होती. मात्र ते कामाख्य मंदिरात देवाकडे प्रार्थना करण्यासाठी गेले असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
शिवसेनेकडून गटनेतेपदावर अजय चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणीही शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केलीय. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरवरुन शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत, असं शिंदे यांनी ट्विटरवर म्हटलं होतं. तसचे संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना २४ तासांचा दिलेला अल्टिमेटम संपला आहे. तरीही शिंदे गट गुवाहटीत असल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.