Ajit Pawar News  Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : 'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आलं, त्यामुळे...'; अजित पवारांचं शिवसैनिकांना आवाहन

महाविकास आघाडीचे उमदेवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ संयुक्त मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

गोपाल मोटघरे

Ajit Pawar News : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत जोरदार रणधुमाळी पाहायला मिळता आहे. या मतदारसंघातील नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी केली आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमदेवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ संयुक्त मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे.

'उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आलं. त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनो आपल्याला चिंचवड आणि कसबा निवडणूक जिंकायची आहे, असं आवाहन अजित पवार यांनी शिवसैनिकांना केलं.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीचे संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने राज्यात कामे केली, त्याची दखल न्यायालयाने देखील घेतली. कोरोना काळात इतक चांगलं काम महाविकास आघाडी सरकारने काम केलं होतं. परंतु जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी गद्दारी केली. त्यानंतर आपलं सरकार गेलं'.

शिवसेनेची बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात देखील दोनदा बंड झालं. पण बंड झाल्यानंतर बंडखोर पुन्हा कधीच निवडून आले नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कवर सांगितलं होत की माझं वय झालं. माझ्या नंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे सांभाळतील. असं बाळासाहेबांनी जाहीर केलं होतं, ही आठवण अजित पवार यांनी शिवसैनिकांना करून दिली.

'उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार करण्यात आलं, त्यामुळे त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनो आपल्याला चिंचवड आणि कसबा निवडणूक जिंकायची आहे, असं आवाहन अजित पवार यांनी शिवसैनिकांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT