SSC-HSC Exam : 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेसंबंधीचा 'तो' निर्णय रद्द; शिक्षणमंत्री म्हणाले...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
SSC-HSC Exam
SSC-HSC ExamSaam tv
Published On

SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीची परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाने प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयावर विद्यार्थ्यांना अडचण करण्याचा हेतू नसल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

कोविड काळात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका नीट वाचून पेपर कसा सोडवायचा आणि नीट वाचण्यासाठी दहा मिनिटे दिली जायची. मात्र, हा निर्णय रद्द केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटाचा वेळ वाढवून द्या, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

SSC-HSC Exam
Maharashtra Politics : 'ताकत लावा, ठाकरेंची मतं भाजपकडे वळवा', 'कसबा'च्या लढाईत CM शिंदेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रश्नपत्रिका गेल्या काही परीक्षांच्या (Exam) प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यामुळे गैरप्रकार टाळण्यासाठी या मंडळाने परीक्षेच्या वेळेआधी दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे परीक्षेच्या कालावधित प्रश्नपत्रिका हातात आल्यावर सुरुवातीच्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिका वाचावी लागणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केसरकर म्हणाले, कॉपीमुक्त महाराष्ट्राचं अभियान राबवलं जात आहे. १० मिनिटांच्या गोल्डन वेळेत पेपर लिक होऊ नये, यादृष्टीने हा प्रयोग केलेला आहे. विद्यार्थ्यांना अडचण करण्याचा हेतू नाही'.

SSC-HSC Exam
Kirit Somaiya : कोविड काळातील कमाईचा हिशोब द्या; किरीट सोमय्या यांनी ट्विट करत सुजित पाटकरांना केला सवाल

दरम्यान, ऑनलाइन शिक्षण (Education) सुरु असताना पेपर लिहिण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी वेळ वाढवून देण्यात आला होता. मात्र, यंदा संपूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असल्याने पेपर वेळेत पूर्ण होईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com