Ajit Pawar On Sharad Pawar Saam Digital
महाराष्ट्र

Ajit Pawar On Sharad Pawar: वय झाल्यावर थांबायचं असतं...', शरद पवारांच्या निवृत्तीबाबत अजितदादांचा पुनरुच्चार

Ajit Pawar On Sharad Pawar: वय झाल्यावर थांबायचं असतं, पण काही थांबत नाहीत. ८०, ८४ झाले तरी हे थांबत नाहीत, आहोत ना आम्ही, ३ वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आहोत, असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवृत्तीचा पुनरुच्चार केला आहे.

Sandeep Gawade

Ajit Pawar On Sharad Pawar

वय झाल्यावर थांबायचं असतं, पण काही थांबत नाहीत. ८०, ८४ झाले तरी हे थांबत नाहीत, आहोत ना आम्ही, ३ वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आहोत, असं म्हणत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवृत्तीचा पुनरुच्चार केला आहे. यावेळी त्यांनी मोदी यांची भरभरून स्तुती केली. आज देशात नरेंद्र मोदी यांच्या सारखं नेतृत्व नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासकामांचा पाढा आज वाचला आहे.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र आलो आहे. २४ तासातले १८ तास ते काम करतात. नऊ दहा वर्षाच्या काळात त्यांनी कधी दिवाळी पाहिली नाही. दिवाळीला घरी न थांबता सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी केल्याच त्यांनी सांगितलं.

कधी कोणाला वाऱ्यावर सोडायच नाही. घेतलेल्या निर्णयावर ठाम राहायच. जातीपातीच राजकारण करायच नाही. ठाण्यात कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढत असते. मात्र वेडे वाकडे धंदे अजिबात चालनार नाहीत. पोलिसांनी डोळ्यात तेल घालून काम कराव, उपमुख्यमंत्री म्हणून पोलिसांना सूचना देत आहे. चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालू नका, अशा सूचना करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात येऊन गुन्हेगारीवर जाहीर भाष्य केलं आहे. तसंच राज्यात वाचाळविरांची संख्या वाढली आहे, असा टोला त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला आहे.   

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळपासून माझ्या गाडीत नजीम मुल्ला आणि आनंद परांजपे बसले आहेत. शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबातत चर्चा झाली. अनेक ठिकाणी ते होत नाही. प्रश्न सोडवायचं असतील तर सत्तेत गेलं पाहिजे. वैयक्तिक लाभासाठी सत्तेत गेलो नाही, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गेलो आहे. सत्तेचा वापर हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करा, असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. दरम्यान वय झाल्यावर थांबायचं होतं, पण काही थांबत नाहीत. ८०, ८४ झाले तरी हे थांबत नाहीत, आहोत ना आम्ही, ३ वेळा उपमुख्यमंत्री राहिलो आहोत, असं म्हणत अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा शरद पवारांच्या निवृत्तीवरून सवाल केला आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता

मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदाधीकाऱ्यांनी बूथनुसार कमिट्या तयार करा. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचा. लोकसभेत आपल्या उमेदवाराचा निवडून आणण्यासाठी कामाला लागा. वेळ कमी आहे, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parliament Monsoon Session: 'ऑपरेशन सिंदूर' का थांबवलं? परत सुरू होणार का ऑपरेशन? संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेत दिलं उत्तर

Kalyan : बनावट फोटो लावून जमिनीचा डेव्हलपमेंट करार, ११ जणांवर गुन्हा दाखल; कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार

Roshani Walia : 'सन ऑफ सरदार २' मध्ये झळकणारी रोशनी वालिया कोण आहे?

Women Travel Tips: परदेशी प्रवास करताना महिलांनी कोणते कपडे घालू नयेत?

Coconut Water : नारळ पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? 99% लोकांना माहीत नसेल

SCROLL FOR NEXT