सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला (NCP) मोठे खिंडार पडले असल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी ज्यावेळी एकनाथ शिंदेंची भेट घेतली, यावेळी राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार राजन पाटील हे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यत्र शरद पवार यांचे जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला हा सर्वात मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी बैठक घेतली होती. त्याच्या दोन दिवसांनी राजन पाटील दिल्लीत गेले आहेत, त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये मोठे खिंडार पडणार असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच मराठवाड्यातही शिवसेनेला (ShivSena) मोठा धक्का बसला आहे. जालना शिवसेनेचे नेते तसेच माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे सुद्धा शिंदे यांच्या गटात सामील झाले असल्याची माहिती आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. (Arjun Khotkar News)
रम्यान, अर्जुन खोतकर यांनी याबाबतच कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, अर्जुन खोतकर यांचा फोन नॉट रिचेबल असल्याने ते आता शिंदे गटात सामील झाले असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट झाल्याची अधिकृत सूत्रांनी दिली होती.
याबाबतची माहिती साम टिव्हीने दाखवली होती. आमदाराच्या बंडानंतर मराठवाड्यात मोठी खिंडार पडण्याची शक्यता देखील साम टीव्हीने वर्तविली होती. त्यानंतर मात्र आज अर्जुन खोतकर हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. (Arjun Khotlkar Join Eknath Shinde Groups)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.