Eknath Khadse News : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव जिल्हा दूध संघाविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. इतकंच नाही तर खडसे यांनी रात्रभर पोलीस स्टेशनसमोरच झोपून आपलं आंदोलन सुरू ठेवलं. (Eknath Khadse News Today)
मेलो तरी चालेल, पण गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही असा इशारा खडसेंनी दिला होता. तब्बल ८ तासांच्या पाठवपुराव्यानंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने अखेर खडसे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रात्रभर पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केलं. (Latest Marathi News)
काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात झालेल्या गैरव्यवहाराबाबत दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैर व्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी झाली असल्याचं म्हटलं आहे. चोरीच्या गुन्हात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन आरोपींना अटक करण्याऐवजी त्यांना फरार करण्यात मदत केल्याचा गंभीर आरोप खडसेंनी पोलिसांवर केला आहे. (Maharashtra News)
तब्बल १६ तास ठिय्या मांडूनही पोलिसांकडून गुन्हा दाखल होत नसल्याने कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला असल्याचं खडसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जोपर्यंत पोलिसांचे कपडे उतरवणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा थेट इशाराही यावेळी एकनाथ खडसे यांनी पोलिसांना दिला.
खडसेंच्या या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रात्रभर शहर पोलीस स्थानकाच्या बाहेर तीन टाकून आंदोलन केलं. आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील या आंदोलना ठिकाणी भेट देऊन यासंदर्भात सखोल माहिती जाणून घेणार असल्याची माहिती आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.