Dhananjay Munde On Vinayak Mete Saam TV
महाराष्ट्र

Dhananjay Munde : 'त्या' चकमकीनंतर आमची मैत्री झाली; धनंजय मुंडेंनी सांगितली मेटेंची आठवण

राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेही मेटे यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आले.

विनोद जिरे

बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पार्थिवावर बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राजेगाव या त्यांच्या मूळ गावी हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. मेटेंनना पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडेही (Dhananjay Munde) मेटे यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी आले. यावेळी त्यांनी मेटेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. (Dhnanjay Munde Vinayak Mete Latest News)

'आज या ठिकाणी अंत्यविधीसाठी यावं लागतंय, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मला आठवतंय मी ज्या वेळेस पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून गेलो, त्यावेळी सभागृहात मेटे साहेबांनंतर मी बोललो. त्यादरम्यान मेटे साहेबांची आणि माझी काहीही शाब्दिक चकमक देखील झाली होती.या चकमकीनंतर आमची मैत्री ही अधिकच वाढली. अशी आठवण धनंजय मुंडेंनी सांगितली.

'लढाव्या नेत्याच्या अंत्यविधीसाठी आम्हाला इथे यावं लागतंय ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मी माझ्या वतीने आणि शरद पवार साहेब आणि राष्ट्रवादीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असं म्हणत धनंजय मुंडे यांनी विनायक मेटेंना श्रद्धांजली वाहिली. Dhnanjay Munde News)

मेटेंना अखेरचा निरोप देण्यासाठी अलोट गर्दी

मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आणून मोठं आंदोलन उभे करणारे विनायक मेटे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बीडमध्ये कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.

मेटेंच्या पार्थिवाला अग्नी देताच कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

विनायक मेटे यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नि देताच हजारो कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. आपला लाडका नेता आपल्यात नाहीत या कल्पनेने अनेकांना हुंदका अनावर झाला. कार्यकर्त्यांच्या डोळ्यातून आपोआप अश्रू आले. तर काहींनी हंबरडा फोडत आपला दुखावेग व्यक्त केला. यावेळी अमर रहे, अमर रहे, विनायक मेटे अमर रहेच्या घोषणाही देण्यात आल्या.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT