Sharad Pawar Saam TV
महाराष्ट्र

NCP Nagaland : आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, भाजपला नव्हे; शरद पवारांनी स्पष्ट सांगितले

'आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. भाजपला नव्हे', असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

Vishal Gangurde

Sharad pawar News : नुकत्याच नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत NDPP आणि भाजप युतीला पक्षाला बहुमत मिळाले . याच नागालँडमध्ये भाजपप्रणित सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे. त्या वृत्ताला शरद पवार यांनी दुजोरा दिला आहे. 'आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. भाजपला नव्हे', असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) पुढे म्हणाले, 'नागालँडचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणची मुख्यमंत्री यांना आमचा पाठिंबा होता. आमचा पाठींबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्री यांना आहे. त्यामुळे भाजपसोबत युती केली नाही'.

'आमचा समझौता त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे.नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचं स्थैर्य येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण पाठिंबा हा भाजप म्हणून नाही, असेही पवार पुढे म्हणाले.

'मला आश्चर्य वाटतं की मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या प्रचारात देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री दोघे गेले होते. प्रधानमंत्री मेघालयाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत असं म्हणत त्यांचा पराभव करा असं म्हटलं होतं, असं म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एन. रिओ यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा

दरम्यान,  नागालँडमध्ये २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांसाठी आपले उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ७ जागांवर राष्ट्रवादीला विजय मिळाला. याबाबत जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात राष्ट्रवादीने म्हटलं की, ४ मार्चला कोहिमा येथे झालेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते, उपनेते, प्रमुख प्रतोद आणि प्रवक्ते यांची निवड करण्यात आली.

तसेच सरकारला पाठिंबा द्यायचा की विरोधी पक्षात राहून काम करायचं यावरही चर्चा झाली. यात नवनियुक्त आमदारांनी आणि स्थानिक पक्षनेत्यांनी राज्याच्या व्यापक हितासाठी मुख्यमंत्री एन. रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपी सरकारचा भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडा पाव मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

Maharashtra Rain Live News: सांगलीतील चांदोली धरण 93 टक्के भरले, धरणातून 11 हजार 630 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

Gadchiroli : राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था; नागरिकांचे अनोखे आंदोलन, खड्ड्यात धान पिकाची रोवणी

Vivek Agnihotri : मराठी जेवण म्हणजे गरीबांचं जेवण... विवेक अग्निहोत्री बरळले, पाहा VIDEO

Mumbai Rain: 'पालिका आयुक्तांचा जलअभिषेक करू', अंधेरीत पाणी साचल्यावर मनसेचा इशारा

SCROLL FOR NEXT