Sharad Pawar News: 'महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा', शरद पवारांनी खोडला संजय राऊतांचा दावा; विधानसभेची रणनितीही सांगितली!
Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा', शरद पवारांनी खोडला संजय राऊतांचा दावा; विधानसभेची रणनितीही सांगितली!

Gangappa Pujari

रुपाली बडवे| ता. २९ जून २०२४

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प काल सादर झाला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या संकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा वर्गासाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या. मात्र आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन हे बजेट सादर केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही महत्वाचे विधान केले असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले शरद पवार?

"अर्थसंकल्पाची गुप्तता ठेवली गेली नाही. अर्थसंकल्प पाहिल्यानंतर या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, त्याची तरतुद होणार नाही, अशा गोष्टींची मांडणी त्याठिकाणी केल्याचे शरद पवार म्हणाले. तीन महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मांडला गेला आहे. त्यामुळे काहीतरी भयंकर करतोय असे दाखवण्याचा हा प्रकार आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

अजित पवार गटाचे काही आमदार पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. यावरही शरद पवार यांनी महत्वाचे विधान केले. "आमदारांच्या घरवापसीबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाच माहिती. माझ्याशी कोणी संपर्क साधला नाही. निदान माझ्यासोबत तरी कोणी बोलले नाही. आधी प्रस्ताव येऊ द्या. मग बघू," असे ते म्हणाले.

मोदींची गँरंटी चालणार नाही..

"लोकसभेला राज्यात ४८ पैकी ३१ जागा आमच्या विचाराच्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे धसका घेतल्याने हा भाषेचा फुलोरा असलेला अर्थसंकल्प मांडला. मात्र लोकांची मानसिकता स्पष्ट झाली आहे. लोक मोदींच्या कारभारावर खुश नाहीत. त्यांची गॅरंटीही चालली नाही, त्यांनी विधानसभेतही जास्तीत जास्त सभा घ्याव्यात," असा टोलाही पवार यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, आणि ठाकरे गट आम्ही बसून निर्णय घेऊ. लोकसभेला शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष यांनी आम्हाला मदत केली. त्यांनाही आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करु, आमची बैठक झाल्यानंतर प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेईल. तसेच महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे. सामाजिक नेतृत्व हेच आमचे सुत्र आहे," असेही शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

Mumabi Traffic: अनंत-राधिकाचा शाही विवाह सोहळा; पाच दिवसांसाठी मुंबईतील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT