Sharad Pawar Kolhapur Visit:  Saamtv
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: 'अंक काढला पण 'अरे बापरे' म्हणायची वेळ आली..' शरद पवारांनी सांगितला वृत्तपत्राचा भन्नाट किस्सा; वाचा सविस्तर

Sharad Pawar Kolhapur Visit: 'केशवराव भोसले नाट्यगृहाला दुर्दैवाने आग लागली, आता हे नाट्यगृह अधिक चांगले करा. या नाट्यगृहात खूप दिग्गज कलाकार घडले. केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्र्यांनी वीस कोटी रुपये निधी जाहीर केला पण त्यात काही होणार नाही," असे शरद पवार म्हणाले.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, ता. ३ सप्टेंबर २०२४

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांची रणनितीसह ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. आज कोल्हापूर दौऱ्यावेळी शरद पवार यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात बोलताना आपणही एक वृत्तपत्र काढले होते असे म्हणत त्यांच्या जिवनातील एक खास किस्सा सांगितला.

काय म्हणाले शरद पवार?

"मी सार्वजनिक कार्यात आलो त्यावेळी मीपण एक वृत्तपत्र काढलं होतं, त्याचे नाव होते नेता. त्या वृत्तपत्राचे फक्त पाच ते सहा अंक निघाले. त्या नंतर आम्ही चौघांनी राजनीती हे मासिक काढायचे ठरवले. त्यासाठी प्रत्येकाने पाच, पाच हजार रुपये काढले. त्याचा अंक पहिला अंक सिद्धी विनायकाच्या चरणी ठेवला. पण अंक काही खपले नाही, त्यामुळे आमच्यावर अरे बाप रे अशी म्हणण्याची वेळ आली," असं शरद पवार यांनी सांगितले.

....म्हणून पुस्तकाचे कव्हर उघडून बघतो

तसेच "मी कोणत्याही कार्यक्रमाला गेलो तर मला अनेक पुस्तक कव्हर घालून भेट म्हणून देतात पण मी सर्व पुस्तक तिथेच उघडून पाहतो, असे म्हणत शरद पवारांनी दुसराही एक खास किस्सा सांगितला. एकदा पुण्यातील एका कार्यक्रमाला गेलो तिथे सुद्धा मला कव्हर घालून एक पुस्तक भेट म्हणून दिले. मी जेव्हा घरी गेल्यानंतर पाहिले तर ते पुस्तक गोलवलकर गुरुजींचं होतं. त्यामुळे मी कुठल्याही कार्यक्रमात मला पुस्तक भेट दिली तर ती उघडून पाहिल्याशिवाय स्विकारत नाही," असं त्यांनी सांगितले.

केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी

दरम्यान, 'केशवराव भोसले नाट्यगृहाला दुर्दैवाने आग लागली, आता हे नाट्यगृह अधिक चांगले करा. या नाट्यगृहात खूप दिग्गज कलाकार घडले. केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्र्यांनी वीस कोटी रुपये निधी जाहीर केला पण त्यात काही होणार नाही, हे नाट्यगृह अधिक चांगले करण्यासाठी 50 कोटी पेक्षा अधिक लागतील. नव्या नाट्यगृहात कलाकारांना सोयी सवलती द्या, मी 1 कोटी रुपये अधिकचा निधी देतो, कोण निधी देत नसेल तर मला सांगा मी त्यांना सांगतो काय सांगायचे,' असे आश्वासनही शरद पवार यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Actress Journey: योगा टीचरवर पडली डायरेक्टरची नजर, केलं फिल्ममध्ये कास्ट; आज आहे कोट्यवधीची मालकीण

मनोज जरांगेंच्या हत्येच्या कट प्रकरणी मोठी अपडेट; आरोपीचा महत्वाचा व्हिडिओ समोर, कोण अडकणार?

Maharashtra Live News Update: निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार

पुण्यात भाजपचा गड ढासळला; बड्या नेत्याचा पक्षाला रामराम, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार साथ

SCROLL FOR NEXT