Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar News: 'भाजपसोबत जाऊ शकत नाही'; शरद पवारांनी आमदारांसमोर स्पष्ट केली राजकीय भूमिका

'भाजपसोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागले, अशी भूमिका त्यांच्या समर्थक आमदारांसमोर स्पष्ट केली.

साम टिव्ही ब्युरो

mumbai News: अजित पवारांनी शिंदे सरकार पाठिंबा दिल्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या आमदारांचे अजित पवार गट आणि शरद पवार गट निर्माण झाले आहेत. यातील अजित पवार गटाने पक्ष एकसंघ राहावा, यादिशेने विचारा करावा, अशी विनंती शरद पवारांना केली. यानंतर शरद पवारांनी 'भाजपसोबत जाऊ शकत नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावे लागले, अशी भूमिका त्यांच्या समर्थक आमदारांसमोर स्पष्ट केली. (Latest Marathi News)

अजित पवार गटाचे आमदार आणि नेत्यांनी सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. आजही उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांनीही भेट घेतली.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड करायलाही सुरुवात केली आहे. नाशिकमध्येही शरद पवार विरुद्ध छगन भुजबळ असा सामना पाहायला मिळाला.

आता गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार गट हा शरद पवारांची भेट घेताना दिसत आहे. अजित पवार गटाने आजही पक्ष एकसंघ राहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा अशी गळ घातली. मात्र, अजित पवार गटाच्या विनंतीनंतर शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.

शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या भेटीनंतर त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतली. त्यांच्या समर्थक आमदारांशी बोलताना शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. 'भाजपसोबत जाऊ शकत नाही, उद्धव ठाकरे आणि काँग्रेससोबत जावं लागेल. शरद पवार यांनी त्यांचे समर्थक आमदार यांच्याशी बोलताना भूमिका केली स्पष्ट केली.

दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार भेटून गेल्यावर शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक आमदारही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले. त्यानंतर त्यांची बैठक सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Maharashtra Live News Update : नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

SCROLL FOR NEXT