NCP Ajit Pawar Reaction Shiv sena Sanjay Raut Statement Maharashtra Politcal News  Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News: संजय राऊत हे मोठे नेते, माझं त्यांच्यावर.., अजित पवारांनी एका वाक्यात विषयच संपवला

Ajit Pawar On Sanjay Raut: संजय राऊत हे मोठे नेते आहे, ते राज्यसभेचे खासदार आहेत. माझं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar On Sanjay Raut: संजय राऊत हे मोठे नेते आहे, ते राज्यसभेचे खासदार आहेत. माझं त्यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना सर्व समजावून सांगितलं आहे. तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अखेर संजय राऊत यांच्याबद्दलच्या विषयावर पडदा टाकला. गद्दारी करूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, अशी टीका देखील पवारांनी केली. ते नागपुरात बोलत होते. (Latest Marathi News)

शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत प्रश्न विचारताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे माध्यमांसमोर थुंकले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संजय राऊत यांना कानपिचक्या दिल्या. त्यामुळे राऊत आणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुंपली. धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेलं बरं असं राऊत म्हणाले. तर राऊत काहीही बोलल्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, असं अजित पवार यांनी उत्तर दिलं. (Maharashtra Political News)

'मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना सहानुभूती'

मुंबई महापालिकेत जनतेने शिवसेनेला कौल दिला होता. आता मात्र, वातावरण बघितलं तर उद्धव ठाकरे यांना जनतेची सहानुभूती आहे. ज्याप्रकारे मधल्या काही घटना वर्षभरापूर्वी घडल्या. त्यातून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता जे सर्वे येत आहेत. त्यातून मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना जास्त जागा मिळतील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये खूप ताकदवान नाही. आमचे कमी नगरसेवक आणि कमी आमदार तिथे निवडूण येतात. आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे, की आपण एकत्रपणे मुंबईत निवडणुकीला सामोरं जाऊ, त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, आपण बसू विचार करू आणि मार्ग काढू, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

दरम्यान, नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असणारे पोस्टर्स नागपूर शहरातील अनेक ठिकाणी लागले आहेत. नाना पटोले भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, कामकरी लोकांचे कैवारी असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला.

'राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक नेत्यांच्या मागे असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो. त्यांचा उत्साह ओसांडून वाहत असतो, म्हणून ते अशा प्रकारे बॅनर्स लावतात. मात्र मुख्यमंत्री बनण्यासाठी विधानसभेत १४५ जागांचं बहुमत लागतं. एकनाथ शिंदे यांनी गद्दारी करून का होईना, हा आकडा गाठला', असा टोलाही अजित पवार यांनी लगावला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT