Ajit Pawar  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फितूर आमदार? अजितदादांचा जाहीर भाषणात गौप्यस्फोट

राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांकडून, 2 ठिकाणी अधिवेशन झाले. मुंबईतल्या अधिवेशनातून अजित पवारांनी पक्षाच्या एका आमदारावर शंका उपस्थित केलीय. एक आमदार शरद पवार गटाला माहिती पुरवतो, असं अजित पवार म्हणालेत. पराभवाची कारणे सांगताना अजित पवारांनी हा गौप्यस्फोट केलाय. पाहूया एक रिपोर्ट...

Bharat Jadhav

गिरीश निकम, साम प्रतिनिधी

राज्यात फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता फितुरीचं राजकारण सुरू झालंय. याचा गौप्यस्फोट केलाय तो स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जूनला 25 वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यात अजितदादांनी अपयशाचं खापर मविआतील काही लोकांवर फोडलंय. सकाळपासूनच भोंगा वाजायचा..

त्यामुळं राज्यात विरोधाचं वातावरण तयार झालं, लोकांची मानसिकता बदलली असं शब्दात नाव न घेता त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. काँग्रेसमधूनही एक जण पुढे आल्याचं म्हणत वडेट्टीवारांवर तोफ डागलीये. तर आमच्यातून बाहेर गेलेलाही रोज सकाळी रेटून बोलत असल्याचा टोला त्यांनी आव्हाडांना लगावला. इथपर्यंत दादांचं बोलणं ठिक होतं. मात्र कोणता तरी आपला एक आमदार फोन करून आतली माहिती बाहेर पुरवतो असा गौप्यस्फोट दादांनी केलाय.

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करताना दादांचा कंठ दाटुन आला. मात्र दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीला माहिती पुरवणा-या फितूर आमदाराला त्यांनी सूचक इशारा दिला. पुन्हा एकदा ऐका दादा काय म्हणालेत.

लोकसभा निवडणुकीतील अपयश पाहता विधानसभेचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे. पवारांबाबत राज्यात असलेली सहानभुती तसंच विरोधक शक्तीशाली झाल्यानं दादांना आपल्याच पक्षातील फितूरांचा बंदोबस्त करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

Methi Hair Oil Benefits: केसांच्या समस्यासाठी मेथी तेल ठरेल गुणकारी, कोंडा, केसगळती होईल लगेचच कमी

बॅगेत दगड भरून तलावात उडी मारली, कोल्हापुरात डॉक्टरने आयुष्य संपवलं, टोकाचा निर्णय का घेतला?

Womens Health: लहान वाटणाऱ्या समस्या महिलांसाठी ठरू शकतात घातक; या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT