Dharmaraobaba Atram Controversial Statement  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'माझ्या मुलगी अन् जावयाला नदीत फेकून द्या', धर्मरावबाबा आत्राम संतापले; काय आहे कारण?

Dharmaraobaba Atram Controversial Statement on daughter : मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दावा केलाय, कुटुंबातील काही लोकांना त्यांचा राजकीय प्रभाव वापरून दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आहे. यावेळी मुलगी आणि जावयावर धर्मरावबाबा आत्राम संतापलेले दिसले.

Rohini Gudaghe

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मार्चेबांधणीला चांगलाच वेग आलाय. बंडखोरी आणि फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता काहीसं वेगळं चित्र आहे. अनेक राजकीय घराण्यांमध्ये देखील फूट पडल्याचं पाहायला मिळालं. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी आपली मुलगी आणि जावयाबाबत देखील असंच एक वादग्रस्त विधान केलंय.

विश्वासघातासाठी माझ्या मुलीला आणि जावयाला नदीत फेकून द्या, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलंय . धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री ही शरद पवार यांच्या गटात सामील होऊ शकते, अशी माहिती मिळतेय. यानंतर राष्ट्रवादीचे नेते (Ajit Pawar Group) आत्राम यांनी आपली मुलगी भाग्यश्री आणि जावई ऋतुराज हलगेकर यांच्याबाबत हे विधान केलंय.

नेमकं काय म्हणाले?

अहेरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संबोधित करताना आत्राम म्हणाले की, इतर लोक पक्ष सोडून जातात, मात्र त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज (aheri assembly jansanman yatra) नाही. परंतु आमच्या कुटुंबातील काही लोकांना माझ्या राजकीय प्रभावाचा वापरून दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आहे. गेल्या ४० वर्षांपासून राज्याच्या राजकारणात लोक पक्षांतराला कारणीभूत आहेत.

आत्राम पुढे म्हणाले की, आता शरद पवार गटाच्या नेत्यांना माझ्या घरात फूट पाडायची आहे. त्यांना माझ्या मुलीला माझ्या विरोधात उभं करायचं आहे. माझी मुलगी आणि जावयावर विश्वास ठेवू (Dharmaraobaba Atram Controversial Statement) नका. या लोकांनी माझी फसवणूक केलीय. सगळ्यांनी मिळून त्यांना प्राणहिता नदीत फेकलं पाहिजे.

थेट इशारा दिला...

त्यांनी पुढे आरोप केलाय, ते माझ्या मुलीची बाजू घेत आहेत. तिला तिच्या वडिलांच्या विरोधात उभे करत आहेत. जी मुलगी आपल्या बापाची मुलगी होऊ शकली नाही, ती आपली कशी होईल? याचा विचार करावा (Maharashtra Politics) लागेल. ती तुम्हाला काय न्याय देईल? त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. राजकारणात मी तिला माझी मुलगी, भाऊ किंवा बहीण म्हणून पाहणार नसल्याचं आत्राम यांनी स्पष्ट सांगितलंय.

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि इतर कल्याणकारी आणि विकास योजनांचा प्रचार करण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम अहेरी दौऱ्यावर आलेले होते. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मंत्री आत्राम यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट

Karnatak Mangaluru Bus Accident : दोन भरधाव बस एकमेकांना धडकल्या; अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद,१४ विद्यार्थी गंभीर जखमी

Bala Nandgaonkar : 'उद्धव ठाकरे आणि साहेबांनी आता एकत्र यावं', बाळासाहेबांच्या सैनिकाचे भावनिक उद्गार

Rinku Rajguru: हातात टाळ, डोक्यावर तुळस; रिंकू राजगुरू विठुरायाच्या भक्तीत तल्लीन

ठाकरे बंधू फक्त ५ तारखेपर्यंतच एकत्र? राज ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानं सांगितली पुढची रणनीती| VIDEO

SCROLL FOR NEXT