Dhananjay munde Sakal
महाराष्ट्र

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचे पाय अजून खोलात; अजित पवारांनी नेमली पक्षांतर्गत चौकशी समिती

Ajit Pawar Action On Dhananjay Munde Allegation: अजित पवार यांनी पक्षांतर्गंत चौकशी समिती नेमलीय. ही समिती धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांची चौकशी केली जाणार आहे.

Bharat Jadhav

संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंचे पाय अजून खोलात जाताना दिसत आहेत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना भ्रष्टाचार केला होता असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मुंडे यांनी ७३ कोटींचा घोटाळा केला, असा आरोप धस यांनी केला होता. याप्रकरणी अजित पवार अॅक्शन मोडवर आले आहेत. धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यासाठी अजितदादांनी समिती नेमलीय. या आरोपांची चौकशी समितीकडून करण्यात येणार आहे.

देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचे नाव नव-नवीन प्रकरणात समोर येत होते. कराडशी मुंडेंचा संबंध असल्यानं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या आमदारांकडून करण्यात येत होती. त्याचदरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी काम न करताना कोट्यवधी रुपयांची बिले उचलली, असा आरोप धस यांनी केला होता. याप्रकरणी अजित पवार अॅक्शन मोडवर आले आहेत.

मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अजित पवारांनी पक्षांतर्गत समिती नेमलीय. या समितीमार्फत मुंडेंवरील सर्व आरोपांची चौकशी करणार आहे. दरम्यान या समितीमध्ये कोण-कोण असेल? कोण या समितीचा अध्यक्ष असेल याबाबत अद्याप कोणतीच माहिती मिळाली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु होणार, आज 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप दिला जाणार

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT