ncp news, mla rohit pawar, mla ram shinde, karjat, jamkhed saam tv
महाराष्ट्र

NCP News : आमदार राम शिंदेवर एनसीपीसह कर्जत-जामखेडकरांचा राेष, पाच ठिकाणी छेडलं रास्ता राेकाे आंदाेलन

MIDC Issue : आमदार राेहित पवार यांच्या भूमिकेला ग्रामस्थांनी दिले समर्थन.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Nagar News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाटेगाव-खंडाळा येथील सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आणि केवळ सरकारच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या एमआयडीसी बाबतचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. कर्जत जामखेड तालुक्यातील पाच ठिकाणांसह सोलापूर नगर महामार्गावरील मिरजगाव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी आज (गुरुवार) रास्ता रोको आंदोलन केले. (Maharashtra News)

आमदार रोहित पवार (mla rohit pawar) यांनी वेळोवेळी उद्योग मंत्र्यांच्या भेटी घेऊन हा विषय मार्गी लावण्याबाबत विनंती केली. अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. विधिमंडळ अधिवेशनात वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतरही सरकारकडून केवळ मंजुरीचे आश्वासन मिळत असल्याने आणि कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने अखेर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात भर पावसात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले.

दरम्यान आंदोलनाला (aandolan) बसलेल्या आमदार रोहित पवार यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन तात्काळ स्वरूपात उद्याच्या उद्या बैठक लावून याबाबत चर्चा केली जाईल असे आश्वासन दिले आणि आंदोलन मागे घेण्याची विनंती आमदार रोहित पवार यांना केली.

आमदार रोहित पवार यांनीही मंत्री महोदयांच्या विनंतीला मान देऊन तात्काळ आंदोलन स्थगित केले. तीन दिवस उलटून देखील कोणतीही बैठक न घेतल्याने आज (गुरुवार) कर्जत - जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी एनसीपी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं आहे.

रास्ता राेका आंदाेलन

कर्जत जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) वतीने आणि ग्रामस्थांच्या तरुणांच्या सहभागाने जवळपास पाच ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले. कर्जत शहर तसेच जामखेड शहरात आणि सोलापूर नगर महामर्गवरील मिरजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आमदार राम शिंदेवर टीका

या वेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. हक्कच्या औद्योगिक वसाहत देण्याबाबत राजकारण होत असून भाजपचे माजी मंत्री आमदार राम शिंदे (mla ram shinde) हेच या प्रकरणात हेतूपूर्वक अडवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता केला आहे. या रस्ता रोको मुळे सोलापूर नगर महामार्ग ठप्प झाला होता. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT