Saam breaking, Gadchiroli, Naxals, Police Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : वेडमपल्ली जंगलात पाेलिसांचा धमाका; शस्त्र टाकून नक्षलवाद्यांनी काढला पळ

पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी पळ काढला.

साम न्यूज नेटवर्क

- मंगेश भांडेकर

Gadchiroli : गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील वेडमपल्ली जंगलात (vedampally jungle) गडचिरोली पोलिसांचे विशेष अभियान पथक नक्षलविरोधी अभियान राबवत असताना रविवारी चकमक उडाली. या चकमकीनंतर पोलीस दलाने मोठ्या प्रमाणात नक्षल (naxal) साहित्य हस्तगत केले आहे.

पोलिस जवान अभियान राबवत असताना लपून बसलेल्या सुमारे पंचवीस नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी पळ काढला.

भूमकाल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घातपाताची योजना नक्षलवाद्यांनी आखली होती. मात्र पोलिस दलाने त्यांची ही योजना हाणून पाडली. चकमकीनंतर जंगलात शोध मोहीम राबवली असता एक भरमार बंदूक, एक पिस्टल, एक वाॅकी टाॅकी, चार्जर व इतर साहित्य सापडले. ते सर्व साहित्य पाेलिसांनी (police) जप्त केले. दरम्यान या जंगल (jungle) परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Sambar Recipe: साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

Maharashtra politics : राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही, शिंदेंच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

SCROLL FOR NEXT