Nawab Malik,  Anil Deshmukh, Supreme Court, Floor Test
Nawab Malik, Anil Deshmukh, Supreme Court, Floor Test  saam tv
महाराष्ट्र

ठाकरे सरकार वाचविण्यासाठी मलिक, देशमुखांची धडपड; सर्वाेच्च न्यायालयात धाव

Siddharth Latkar

मुंबई : आगामी काळात राज्यातील विधानसभेत घेतल्या जाणा-या बहुमत चाचणीसाठी (maharashtra floor test latest updates) मतदान करता यावे यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) धाव घेतली आहे. फ्लोर टेस्टमध्ये मतदान करण्याची परवानगी दाेन्ही आमदारांनी याचिकेच्या माध्यमातून न्यायालयास मागितली आहे. (maharashtra political latest marathi news)

राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत चाचणी द्यावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिक आणि देशमुख यांनी वकील सुधांशू चौधरी यांच्या माध्यमातून आज दुपारी एक वाजता न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर याचिका दाखल केली आहे.

राज्यपालांच्या फ्लोअर टेस्टच्या निर्देशाला आव्हान देणारी याचिका आज सकाळी शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी दाखल केली आहे. त्या याचिकेवर सायंकाळी पाच वाजता सुनावणी हाेणार आहे. मलिक आणि देशमुख यांच्या याचिकेवर खंडपीठाने संध्याकाळी साडे पाच वाजता सुनावणी घेतली जाईल असे म्हटले आहे.

मलिक हे अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत तर देशमुख हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही सदस्य मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोन वेगवेगळ्या प्रकरणात मुंबईतच जेलमध्ये आहेत. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मतदानास परवानगी देण्याची त्यांची याचिका फेटाळून लावली होती.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून महिला भाविकास धक्काबुक्की

Mumbai Indians Playing XI: हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकरला संधी मिळणार? पाहा कशी असेल मुंबईची प्लेइंग ११

Solo Travel Tips: एकट्याने फिरायला जाण्याची आवड आहे;मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Baramati Constituency: हे चार विधानसभा मतदारसंघ संवेदनशील जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाची मागणी

Nashik Loksabha: मनधरणी निष्फळ! शांतीगिरी महाराज अपक्ष लढण्यावर ठाम; नाशिकमध्ये महायुतीची वाट बिकट?

SCROLL FOR NEXT