नवरात्रोत्सव आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त गडावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते.
नाशिक विभागातून जादा बसेसचे नियोजन करण्यात आलंंय.
भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बसेस धावणार.
नवत्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सप्तशृंगी गडावर मोठी गर्दी होत असते. गडावर जाणाऱ्या भाविकांकरिता जादा बसेसची सुविधा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून करण्यात आलीय. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर आणि कोजागरी पौर्णिमेनिमित्त ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत या जादा बसेस धावतील.
नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठपैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर येत असतात. सोमवारपासून नवरात्र उत्सव सुरू होतोय, त्यामुळे भाविकांसाठी जादा बसेसची सुविधा पुरवली जाणार आहे. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता दरवर्षी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाद्वारे प्रवाशी वाहतुकीचे नियोजन केले जात असते. यावर्षीही जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
दरम्यान सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी डोंगर घाटातून जावे लागते. उत्सव काळात भाविकांची गर्दी वाढत असते. त्यामुळे खासगी वाहनांना गडावर प्रवेश नसतो. नांदुरी येथे खासगी वाहने उभी करून भाविकांना एसटी महामंडळाच्या बसेसने गडावर जावे लागते. नाशिक ते सप्तशृंगी गडदरम्यान दररोज विद्युत बसेसच्या ३० फेऱ्या चालविण्यात येत असतात.
नवरात्रोत्सवातही पहाटे ५ ते सायंकाळी साडेसात या दरम्यान या बसेस उपलब्ध असणार आहेत. यंदा ३२० जादा बसेसचे नियोजन करण्यात आल्याची माहिती प्रभारी विभाग नियंत्रक किरण भोसले यांनी माध्यमांना दिलीय. यापैकी १४० जादा बसेस नांदुरी ते सप्तशृंगी गड या मार्गावर धावतील.
नांदुरी ते सप्तशृंग गड -१४०-२५
नाशिक ते सप्तशृंग गड -११०-१३२
मालेगाव ते सप्तशृंग गड -३० -१६२
मनमाड ते सप्तशृंग गड -१५ -१६२
सटाणा ते सप्तशृंग गड -१५ -११२
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.