mp navneet rana over inappropriate ganesh visarjan Saam TV
महाराष्ट्र

Video: खासदार नवनीत राणांनी बाप्पाच्या मुर्तीसोबत काय केलं पाहा; शिवसेना नेत्या म्हणाल्या, हेच का यांचं हिंदुत्व?

Navneet Rana Viral Video: व्हायरल व्हिडिओमध्ये नवनीत राणांची गणेश मुर्तीला गढूळ पाण्यात फेकून देत विसर्जन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे, अमरावती

अमरावती: गेले ११ दिवस अवघ्या देशाने बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाला निरोप दिला. गणपती विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले. गणेश विसर्जन करताना मुर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी योग्य त्या पद्धताने सन्मानपुर्वक बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी गणेश मुर्तीचे ज्या क्रुरपणे विसर्जन केले त्यामुळे त्यांच्यावर राज्यभरातून टीका केली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवनीत राणांची गणेश मुर्तीला गढूळ पाण्यात फेकून देत विसर्जन केले आहे. त्यामुळे विसर्जनाची ही कुठली पद्धत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी ट्विट करत "हेच तुमचं हिंदुत्व" अशी बोचरी टीका केली आहे. (Navneet Rana Ganesh Visarjan Video)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांसोबत केलेल्या राड्यामुळे त्या आधीच वादात सापडल्या आहेत. पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी नवनीत राणांविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन केलं आणि कारवाईसाठी पोलिस पत्नी आक्रमक झाल्यात हाच वाद संपला नसला तरी पुन्हा एका नवीन धार्मिक वादात नवनीत राणा यांना ट्रोल केलं जातं असून त्यांच्यावर आरोप आणि टीका केली जात आहे.

९ तारखेला डोक्यावर आपल्या घरचा गणपती घेऊन त्यांनी अमरावती येथील छत्री तलावात विसर्जन केला. मात्र गणपती विसर्जनाची पद्धत चुकीची असल्याचा आरोप होत आहे. गणपती विसर्जन करतांना त्यांनी गणपती चक्क क्रूरपणे गढूळ पाण्यात फेकला. यामुळे गणपतीचा त्यांनी अवमान केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे गणपती विसर्जनाचा हा नवा वाद पुढं आल्यामुळे पुन्हा नवनीत राणा यांच्या सर्वत्र टीका होत असून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT