Digha Railway Station Saam TV
महाराष्ट्र

Digha Railway Station: नवी मुंबई मेट्रोप्रमाणे दिघा रेल्वे स्थानकही सुरु करा; ठाकरे गटाची मागणी

Navi Mumbai Digha Railway Station Update News: दिघा रेल्वे स्थानक देखील सुरु करा अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केली आहे.

Ruchika Jadhav

Navi Mumbai:

नवी मुंबई मेट्रोप्रमाणे दिघा रेल्वे स्थानक देखील सुरु करा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. खासदार राजन विचारे यांनी ही मागणी केलीये. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

पंतप्रधानांनी उद्घाटनाची वाट न पाहता मेट्रो सुरू केली. त्याप्रमाणे आता त्यांनी दिघा रेल्वे स्थानक सुरू करावे अशी मागणी करण्यात आलीये. दिघा स्थानक तयार असूनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. दिघा स्थानक सुरू होत नसल्याने प्रवाशांचे मोठ्याप्रमाणात हाल होताहेत.

नवी मुंबईच्या बेलापूर ते पेणधर मार्गावर मेट्रो ट्रेन आजपासून सुरू झाली. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिसाला मिळाला आहे. त्यानंतर आता दिघा रेल्वे स्थानकाचा मुद्दा जोर धरू लागलाय. दिघा रेल्वे स्थानक सुरू झाल्यास विटावा, दिघा वासियांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होऊन बरेच दिवस झालेत. मात्र अद्यापही प्रवाशांसाठी स्टेशन खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना ठाणे कळवा या रेल्वे स्टेशनचा वापर करावा लागतोय.

१४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मेट्रो सेवा सुरु

गेल्या १४ वर्षांपासून नवी मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज ही मेट्रो सेवा सुरु झाली आहे.

मेट्रोचं वेळापत्रक

ही मेट्रो सेवा १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान दुपारी ३.०० वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता असणार आहे. तसेच १८ नोव्हेंबर २०२३ पासून पेणधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेणधर दरम्यान सकाळी ०६.०० वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता होणार आहे. मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT