Panvel News Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना प्रवेशबंदी; गाढेश्‍वर, देहरंग, मोरबे धरणांचा समावेश

Navi Mumbai News : पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून वाजेफाटा येथे नाकाबंदी आयोजित केली असून रहिवाश्याशिवाय कोणालाही सदर ठिकाणावरून सोडण्यात येत नाही

Rajesh Sonwane

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: पावसाळ्यात धबधबे पाण्याने प्रवाहित होत असतात. यामुळे अशा पर्यटन स्थळांवर पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत असतात. दरम्यान यात काही अनुचित घटना घडत असतात. हा घटना घडू नयेत यासाठी पनवेल तालुक्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर यापुढे पर्यटकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यासाठी आतापासून नाकाबंदी लावण्यात आली आहे. 

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढेश्‍वर, देहरंग, मोरबे ही धरणे तसेच वारदोली धबधबा, कुंडी धबधबा, हरीग्राम नदीपात्र, धोदाणी, चिंध्रण, महोदर, शांतीवन नदीपात्र, माची प्रबळ, गाढी नदीपात्र अशा ठिकाणी पावसाळी पर्यटन स्थळे आहेत. सदर ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली असून वाजेफाटा येथे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी आयोजित केली असून रहिवाश्याशिवाय कोणालाही सदर ठिकाणावरून सोडण्यात येत नाही.

कावळेसाद पॉईंटवर पर्यटकांची गर्दी
सिंधुदुर्ग : पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन असलेल्या आंबोलीतील कावळेसाद पॉईंटवर पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. विकेंडची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी पर्यटक आंबोली धबधबा व कावळेसाद पॉईंटवर मौजमजा करण्यासाठी दाखल झाले आहेत. कावळेसाद पॉईंटवर असणारी खोल दरी व डोंगरांच्या रांगांमध्ये आलेले ढग, असे नयनरम्य दृश्य पाहण्याचा आनंद घेताना पर्यटक दिसून येत आहेत. 

माथेरान पर्यटन स्थळ हाउसफुल
सुट्यांचा कालावधी असून बकरी ईद व रविवार अशा सलग दोन दिवसांच्या सुट्या असल्याने सुट्टीचा आनंद आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक माथेरानमध्ये मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. यामुळे माथेरान सद्यस्थितीला हाऊसफुल्ल झाले आहे. याठिकाणी क्षणभर विश्रांती घेतल्यानंतर पर्यटक मोठ्या प्रमाणात कर्जत माथेरान या ठिकाणी पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT