सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : आजच्या जमान्यात साखरपुडा व विवाह समारंभासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असल्याचे पाहण्यास मिळत असते. त्यानुसार आगरी कोळी समाजात देखील साखरपुडा, हळद आणि लग्न समारंभात होणाऱ्या वारेमाप खर्चावर नियंत्रण यावे; यासाठी नवी मुंबईतील सानपाडा देवस्थान समितीने एक स्तुत्य निर्णय घेतला आहे. यात एकाच दिवशी सर्व विधी केल्यास हॉल मोफत आणि ५१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे.
आजकाल लग्न समारंभ म्हटला म्हणजे खर्चाला लिमिट नाही. म्हणजेत लग्नात हौस व मौज करण्यासाठी खर्चाकडे पहिले जात नाही. त्यानुसार कोकण पट्ट्यातील आगरी कोळी समाज हा साखरपुडा, हळद आणि लग्न समारंभासाठी लाखो रुपयांचा खर्च करत असतो. अनेक वेळा या लग्न समारंभावर होणारा खर्च हा २५ ते ५० लाखांच्या घरात जात असतो. अर्थात लग्न समारंभात करण्यात येणारा खर्च हा प्रतिष्ठेचा समजला जात असून यासाठी आपली राखीव जमीन आणि गरजेपोटी बांधलेल्या घराची विक्री देखील समाजातील अनेक नागरिक करत असतात.
सानपाडा देवस्थान समितीचा निर्णय
लग्न समारंभांवर होणारा हाच वारेमाप खर्च आणि पैशांची उधलपट्टी थांबावी; या दृष्टीने सानपाडा देवस्थान समितीतर्फे सानपाडा ग्रामस्थ्यांसाठी एकाच दिवशी साखरपुडा हळद आणि लग्न समारंभ करा आणि लग्नासाठी लागणारा हॉल सोबतच 51हजार रुपये रोख प्रोत्साहनपर बक्षिस मिळवा असा स्तुत्य निर्णय घेतला आहे. अनावश्यक खर्च टाळून समाजाला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या हा निर्णय मानला जात आहे.
अर्ध्या किंमतीत जेवण, मंडप व बँड
अर्थात या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत असून आगरी कोळी समाजातील अनेकांनी आपल्या लग्न समारंभाच्या विधी एकाच दिवशी करुन या निर्णयाला आपला पाठिंबा दर्शविला आहे. यासोबतच अनेकांनी मदतीचा हात पुढे करत हा निर्णय मानणाऱ्या कुटुंबाला अर्ध्या किंमतीमध्ये जेवण, मंडप, बँड देण्याची देखील तयारी दर्शविली आहे. हाच आदर्श कोकण पट्ट्यातील सर्व गावांनी घ्यावा आणि लग्न समारंभात होणारी उधळपट्टी थांबवावी; असे आवाहन सानपाड्यातील माजी नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.