सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : नवी मुंबईच्या वाशीमध्ये एका इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर अग्निशमन विभागाने नियंत्रण मिळविले असून येथील रहिवाशांना देखील बाहेर काढले आहे. मात्र या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
नवी मुंबईच्या (Navi Mumbai) वाशी येथील Jn 3 टाईप या इमारतीच्या तळ मजल्यावरील एका फ्लॅटला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याने इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाली होती. यानंतर रहिवाशांनी अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. यानंतर (Fire Brigade) अग्निशमन विभागाचे पथक लागलीच घटनास्थळी दाखल झाले होते.
तळ मजल्यावर आग लागल्याने इमारतीमधील सर्व रहिवाशांना अग्निशमन दलाने बाहेर काढले. दरम्यान आगीमध्ये एक वृद्ध व्यक्ती फ्लॅटमध्ये अडकला होता. मात्र अग्निशमन दलाने वृद्ध व्यक्तीला बाहेर काढल्याने नागरिक आणि अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेमुळे एका वृद्धाचे प्राण वाचले आहेत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून यात एक इसम गंभीर जखमी झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.