Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : इन्कम टॅक्स अधिकारी बनून महिलेची फसवणूक; १ कोटी ८१ लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक

Navi Mumbai News : वेगवेगळ्या पद्धतीने आमिष देऊन फसणूकीचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये आता सुशिक्षित असलेल्या महिला व पुरुषांना टार्गेट केले जात आहे. फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहेत

Rajesh Sonwane

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: सायबर गुन्हेगारी थांबत नसून याला अनेकजण बळी पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अशाच प्रकारे नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली आहे. यात बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एक महिला प्रोफेसरला १ कोटी ८१ लाखाला चुना लावला आहे. या प्रकरणात क्राईम ब्रॅंन्चने तीन आरोपींना अटक केली आहे. 

वेगवेगळ्या पद्धतीने आमिष देऊन फसणूकीचे प्रकार समोर येत आहेत. यामध्ये आता सुशिक्षित असलेल्या महिला व पुरुषांना टार्गेट केले जात आहे. आर्थिक फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहेत. त्यानुसार नवी मुंबई मध्ये एका महिला प्रोफेसरला इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट करत पैसे घेत फसवणूक करण्यात आली आहे.  

डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगत धमकी 

नवी मुंबई मधील नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल केला होता. दिल्ली येथे तुमच्याविरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली असल्याचे सांगण्यात आले. यामुळे आर्थिक घोटाळ्यात अटक असलेल्या व्यक्तीकडे तुमचे क्रेडिट कार्ड असल्याचे सांगितले. यामुळे तुम्ही डिझीटल अरेस्ट झाला असल्याचे भासवून महिलेला धमकी देण्यात आली. यातून सुटण्यासाठी पैशांची मागणी केली. 

टोळीतील तिघेजण ताब्यात 
यानंतर संबंधित महिलेकडून सहा वेगवेगळ्या बॅंकेतून १ कोटी ८१ लाख रूपये उकळण्यात आले. याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून क्राईम ब्रॅन्चकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रमेश बाबूलाल शेठ, अमिश दीपक तुळशीदास शहा आणि राजकुमार नारंग या तिघांच्या टोळीला अटक केली. दरम्यान आरोपींनी याआधी अशा पध्दतीने अनेक गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे म्हणजे मराठी, हा भ्रम संपलाय, योगेश कदम यांचा दावा

EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

Crime News : धक्कादायक! मामा कामावर गेला, मामीने संधी साधली, भाच्यावर लैंगिक अत्याचार केले अन्...

भाजप नेत्याचा भररस्त्यात राडा! लाठ्याकाठ्या अन् दगडाने अमानुष मारहाण; ठाकरेंच्या शिलेदारानं पोस्ट केला थरकाप उडणारा VIDEO

Cabinet Expansion : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, शिंदेंसेनेच्या नेत्याच्या त्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT