Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : अंगणवाडीतील पोषण आहारात अळ्या; मुलांच्या जीवाशी खेळ, संतप्त पालकांकडून तक्रार

Navi Mumbai News : शाळा, अंगणवाडीमध्ये पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहारातील धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच शिजविलेल्या अन्नात देखील अळ्या, किडे निघत असल्याचा प्रकार देखील घडतात

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 

नवी मुंबई : अंगणवाडीमधील बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना कळंबोली वसाहतीत मधील अंगणवाडी क्रमांक ५५ मध्ये घडली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधीत विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचे स्पष्ट होत आहे.

शाळा, अंगणवाडीमध्ये पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहारातील धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या आहेत. तसेच शिजविलेल्या अन्नात देखील अळ्या, किडे निघत असल्याचा प्रकार देखील घडत असतात. अर्थात बालकांच्या जीवाशी खेळ सुरु असताना देखील याबाबत गांभीयाने दखल घेतली जात नाही. यानंतर पुन्हा एकदा नवी मुंबईच्या कळंबोली वसाहतीमधील अंगणवाडीतील मुलांना दिलेल्या आहारात अळ्या निघाल्या आहेत. 

आहार शिजविण्याचे काम बचत गटाकडे 

शासन निर्देशानुसार विविध भागात सुरु असलेल्या अंगणवाड्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासह पोषण आहाराचे नियमित वितरणही केले जाते. दरम्यान कळंबोली वसाहतीमधील अंगणवाडीत पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी नवी मुंबईतील नेरुळ येथील महिला बचत गटाकडे देण्यात आली आहे. बचतगटाकडून रोज ठरल्याप्रमाणे पोषण आहार देण्यात येत असतो. त्यानुसार आज रव्याचा उपीटच करण्यात आला होता. 

आहारात निघाल्या अळ्या 

अंगणवाडी क्रमांक ५५ या ठिकाणी नेहमीप्रमाणे बालकांना पोषण आहारात रव्या पासून तयार करण्यात आलेल्या उपीटच वाटप करण्यात आलं होत. या वेळी काही बालकांनी आहार खाल्ला तर काही बालकांनी आहार घरी नेला. शालेय पोषण आहार घरी नेल्यानंतर अंगणवाडीतील एका बालिकेच्या आहारात अळ्या असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. पालकांनी तात्काळ या बाबतची तक्रार बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली असून त्यांनी चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT