Navi Mumbai Nerul Uran local Saam Tv News
महाराष्ट्र

Mumbai Local : हलता येई ना, उतरता येईना; ऐन पुलावर ट्रेन बंद पडल्यानं प्रवाशांची गैरसोय, नेरुळ-उरण लोकल सेवा ठप्प

Navi Mumbai Local Train : ब्रीजवर ट्रेन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचं समोर आलं आहे. सायंकाळच्या सहा वाजल्यापासून ही लोकल रेतीबंदर येथे बंद पडून उभीये.

Prashant Patil

नवी मुंबई : हार्बर लाईनवरील नेरुळ-उरण लोकल सेवा जवळपास दोन तासापासून ठप्प असल्याची बातमी समोर आलीय. बेलापूर येथील रेतीबंदरजवळ ही लोकल बंद पडली आहे. ब्रिजवर ट्रेन बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचं समोर आलं आहे. सायंकाळच्या सहा वाजल्यापासून ही लोकल रेतीबंदर येथे बंद पडून उभीये. रेल्वे ट्रॅकमध्ये काही तांत्रिक बिघड झाल्यामुळे ही लोकल बंद असल्याचं सांगण्यात येतंय. रेल्वे कर्मचाऱ्यांचे रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कामावरुन घरी निघालेला चाकरमान्यांचे मात्र हाल होत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, ऐन पुलावर लोकल थांबल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झालेली दिसत आहे. काही प्रवाशांनी तर पायी आपल्या घराची वाट धरलीय. पुलावर लोकल बंद पडल्याने बरेच प्रवाशी लोकलच्या खाली देखील उतरत नाहीयत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT