नवी मुंबईतील 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळा प्रकरणी आमदार रोहित पवारांनी संजय शिरसाटांना चांगलंच घेरलंय...बॅगभर पुराव्यांसह 12 हजार पानांचे कागदपत्रं सादर करत मुख्यमंत्र्यांकडे शिरसाटांच्या राजीनाम्याची मागणीच केलीय...
खरं तर संजय शिरसाट सिडकोचे अध्यक्ष असताना नवी मुंबईतील 150 एकरचा भुखंड बिवलकर यांना दिला.. त्यातून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय... मात्र मुख्यमंत्र्यांनी पुरावे देण्याचं आव्हान रोहित पवारांना दिलं होतं..
रोहित पवारांनी फक्त 12 हजार पानांचे बॅगभर पुरावेच सादर केले नाहीत... तर शिरसाटांनी 5 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे पैसे हॉटेल आणि MIDC तील भूखंड विकत घेण्यासाठी वापरल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय...
विट्झ हॉटेल खरेदी, शेंद्रा एमआयडीसीतील ट्रक टर्मिनन्सचा भूखंड लाटल्याचा आरोप, त्र्यंबकेश्वरमधील जमीन खरेदी आणि बेडरुममध्ये पैशांची बॅग आढळून आल्याने शिरसाट अडचणीत सापडलेत.. त्यातच आता नवी मुंबईतील जमीन घोटाळ्यामुळे शिरसाटांचा पाय आणखीच खोलात गेलाय.. आता रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पुराव्यांची बॅग दिल्यानंतर मुख्यमंत्री शिरसाटांचा राजीनामा घेणार की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला फटका बसू नये म्हणून अभय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.