Navi Mumbai Crime Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai Crime : जुगाराच्या नादात झाला कर्जबाजारी; पत्करला चोरीचा मार्ग, १८ रिक्षा चोरणारा अटकेत

Navi Mumbai News : नवी मुंबईच्या पनवेल व कळंबोली परिसरात रिक्षा चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी तपासाला सुरवात करण्यात आला होता

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: नवी मुंबईतील पनवेल आणि कळंबोली क्षेत्रात मागील काही दिवसांमध्ये रिक्षा चोरीच्या तक्रारी वाढल्या होता. यात तब्बल १८ रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणी एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात जुगार खेळत असल्याने यामध्ये पैसे हरल्याने डोक्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी चोरी करण्याचा मार्ग संबंधित चोरट्याने अवलंबला होता. 

नवी मुंबईच्या पनवेल व कळंबोली परिसरात रिक्षा चोरीच्या घटना घडल्या होत्या. याबाबत पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला सुरवात करण्यात आला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक मदतीच्या सहाय्याने एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने पनवेल आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण 18 रिक्षा चोरल्याची कबुली दिली. 

बुलढाण्यात नेवून रिक्षांची विक्री 

रिक्षा चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी निसार खान याला ताब्यात घेतले. निसार हा मूळ बुलढाणा येथीला रहिवासी आहे. पनवेल व कळंबोली येथून रिक्षा चोरी करून तो बुलढाणाला घेऊन जात असे. यानंतर स्क्रॅपच्या रिक्षा असल्याचे सांगत त्यांची विक्री करत होता. आरोपी निसार खान पनवेलमधील कच्छी मोहल्ला इथे राहून चोरी करत आणि चोरलेल्या रिक्षा बुलढाणाला जाऊन विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

जुगार खेळण्यातून झाले कर्ज 

निसार खान याला जुगार खेळण्याची सवय लागली होती. जुगार खेळण्यात पैसे हरल्याने काही जणांकडून उसन्वरीने पैसे घेतले होते. हे पैसे फेडू शकत नसल्याने त्याने चोरी करण्याचा मार्ग पत्करला होता. दरम्यान पनवेल परिसरातून निसारने रिक्षा चोरी केलेल्या १२ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या एकूण १८ रिक्षा हस्तगत केल्या असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT