Beed Crime News : मुकादमाच्या जाचाला कंटाळून ऊसतोड मजुराने घेतला गळफास; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Beed News : बीडच्या तालखेड येथील रहिवासी ऊसतोड मजूर अविनाश गोरख क्षीरसागर यांचा काल खतगव्हाण येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती
Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv
Published On

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील खतगव्हाण येथे एका ऊसतोड मजुराचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. दरम्यान या प्रकरणात मुकादमाने नातेवाईकांकडून खून केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तर या प्रकरणी आज सिरसाळा पोलीस ठाण्यात मुकादमा विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बीडच्या तालखेड येथील रहिवासी ऊसतोड मजूर अविनाश गोरख क्षीरसागर यांचा काल खतगव्हाण येथे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान या संदर्भात अविनाशच्या नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी घात केल्याचा संशय व्यक्त करताना मुकादमा विरोधात गंभीर आरोप केले होते. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Beed Crime News
Santosh Deshmukh Case: मोठी बातमी! कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार, कोर्टानेच दिले आदेश

दोन लाख रुपयांची घेतली होती उचल 

दरम्यान मुकादमाकडुन चार महिन्यांपुर्वी ऊसतोड मजूर अविनाश क्षीरसागर याने दोन लाख उचल घेतली होती. यामुळे घेतलेले दोन लाख रुपये मुकादम मागत होता. शिवाय घेतलेले दोन लाख रुपये का देत नाही? असे म्हणत दोन दिवसांपूर्वी अविनाश क्षीरसागर यास मुकादमाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप देखील अविनाश यांच्या नातेवाईकांनी केला आहे. 

Beed Crime News
Ladki Bahin Yojna : पडताळणीनंतरच 'लाडकी'ला हफ्ता? पडताळणी होईपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता नाही? फेब्रुवारीत लाडकींची संख्या घटणार

मुकादमविरुद्ध गुन्हा दाखल 

दरम्यान अविनाश याना झालेल्या मारहाणीला कंटाळून व सततच्या त्रासला कंटाळून अविनाश यांनी गळफास घेतल्याचे नातेवाईकांनी म्हटले असून दरम्यान आज या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात मुकादम विठ्ठल पवार यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com