Navid Musharif SAAM TV
महाराष्ट्र

Navid Mushrif : छापेमारीनंतर नावीद मुश्रीफ यांची आक्रमक भूमिका; म्हणाले, आमच्या केसालाही धक्का...

हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक झाले आहेत.

Ruchika Jadhav

Navid Musharif : काल (११ जानेवारी) राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. सकाळी ७ वाजताच कोल्हापुरातील कागल येथील हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. एकूण १२ तास ही छापेमारी सुरू होती. आता हसन मुश्रीफ यांचे पुत्र आक्रमक झाले आहेत. नावीद मुश्रीफ यांनी ही कारवाई राजकीय हेतूने केल्याचं म्हटलं आहे. (Latest Navid Mushrif News)

छापेमारी सुरू झाली त्यावेळी हसन मुश्रीफ त्यांच्या घरी नव्हते. अशात आता झालेल्या छापेमारीवर नावीद यांनी म्हटले आहे की, " आमच्यावर राजकीय हेतूने कारवाई करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता ईडी अधिकारी आमच्या घरी पोहचले. त्यांनी अचानक घरावर धाड टाकली. यावेळी अधिकाऱ्यांना सारखे वरून फोन येत होते. आमच्या घरावर ईडी धाड टाकेल असे आमच्या कर्यकर्तांना गेल्या चार दिवसांपासून सांगण्यात येत होते. मात्र आता आमच्यावर ज्यांनी कारवाई केली त्यांना आम्ही नाही तर, जनता चोख उत्तर देईल. जोपर्यंत आमच्या पाठीशी जनता आहे, तोपर्यंत आमच्या केसालाही धक्का लागणे शक्य नाही." , असे वक्तव्य नावीद मुश्रीफ यांनी केले आहे.

पुढे ईडीला केलेल्या सहकार्यावर ते म्हणाले की, " जेव्हा धाड पडली तेव्हा आम्ही सर्वांनी अधिकाऱ्यांना सहकार्य केले. त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रे आणि विचारलेले सर्व प्रश्न यांची उत्तरे आम्ही दिली आहेत. " चौकशी सुरू असताना हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर कर्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांचे देखील नावीद मुश्रिफ यांनी आभार मानले आहेत.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही महिन्यांपूर्वी हसन नुश्रीफ यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील १०० कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत त्यांनी आरोप केले होते. अशात ही कारवाई याचप्रकरणामुळे झाल्याचे समजते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेस -मनसे आघाडीबाबत विजय वडेट्टीवार यांचं पुन्हा भाष्य

Pune : गावाकडून शहराकडे...! पुण्यात कोयता गँगनंतर बिबट्याची दहशत; सतर्क राहा पण घाबरू नका, वन विभागाचं आवाहन

Gauri Palwe: गर्भपात अन् कागदावर अनंतचं नाव; गौरी पालवे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, अडगळीच्या वस्तूंमध्ये सापडले महत्त्वाचे पेपर

Monday Horoscope : श्री गणरायांची कृपादृष्टी पडणार; ५ राशींच्या लोकांना मिळणार शुभसंकेत

लोकांच्या खऱ्या प्रश्नांना बगल; खान, पठाण, शेलार, शिंदे या नावांवर राजकारण; भाजप नेत्यांच्या आरोपावर असलम शेख काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT