ncp  saam tv
महाराष्ट्र

अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सुनील तटकरेंनी दिली मोठी हिंट

ashok kharat news : अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सुनील तटकरे यांनी पोस्ट करून माहिती दिली.

Vishal Gangurde

अशोक खरात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

सुनील तटकरे यांनी केली निष्पक्ष तपासाची मागणी

विरोधकांकडून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे पाय राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडून धुतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. भोंदूबाबा खरात आणि चाकणकराचे अनेक व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी विविध राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा निर्णय उद्या होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जिजाई बंगल्याच्या बाहेर पडून मुंबईसाठी रवाना झाल्या आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, ' नाशिकच्या अशोक खरात प्रकरणातील काही माहिती उद्विग्न करणारी आहे. देवाच्या आणि श्रद्धेच्या नावाने अशा काही गोष्टी होतील, याची कल्पना मी किंवा कोणीच कधीही करू शकत नाहीये. सार्वजनिक जीवनात वावरताना प्रत्येकाचाच अनेक व्यक्ती आणि संस्थांशी संपर्क येतो'.

'अनेकदा संपर्क थेट स्वरूपाचे असतेच असे नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की, एखादे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तीला पाठिशी घातले जाईल. आता या प्रकरणातील पीडित महिलांनी समोर येऊन पोलिसांत तक्रार नोंदवावी. महायुती सरकार या प्रकरणात ठाम भूमिका घेईल. तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई करेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुद्धा या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाच्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत ती आम्ही उचलू, असे तटकरेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवरी स्टेजवरून उतरली अन् नवरदेवासमोरच बॉयफ्रेंडला घातली माळ; लग्नाच्या मांडवात फिल्मी ड्रामा, पाहा व्हिडिओ

Kalyan : "मी संविधान मानत नाही..." सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला बेड्या, कल्याणमधील घटना

Cancer Risk: कॅन्सर पुन्हा होण्याचा धोका कोणत्या रुग्णांना जास्त असतो? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Maharashtra News Live Update: कात्रज घाटामध्ये ट्रॅफिक जॅम

Actress Harassment: सुट्टीत आजोळी गेल्यावर चुलत भावाने केलं शारीरिक शोषण; अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT