देशपातळीवर स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या लातुरात घाणीचे साम्राज्य दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

देशपातळीवर स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या लातुरात घाणीचे साम्राज्य

देशात स्वच्छता जोपासण्यात अग्रेसर असताना, शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीनगर गल्लीत महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याचे विलगिकरण करण्यासाठी कचरा डेपो उभारला

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

लातूर : शहर महानगरपालिका Municipal Corporation देशात स्वच्छता जोपासण्यात अग्रेसर असताना, शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील श्रीनगर गल्लीत महानगरपालिकेच्या वतीने कचऱ्याचे विलगिकरण करण्यासाठी कचरा डेपो Garbage Depot उभारला आहे. पण सध्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलं असल्याने स्थानिक नागरिकांनी विरोध सुरू केला आहे.

हे देखील पहा-

लातूर शहर महानगरपालिका ही काँग्रेसच्या Congress ताब्यात असून, महापौर Mayor विक्रांत गोजामगुंडे यांनी स्वच्छतेचे उत्तम कार्य केल्याने देशभरात नावलौकिक मिळवला आहे. पण याच शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये श्रीनगर कॉलनीत सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करण्यासाठी कचरा डेपो उभारला आहे. सध्याला पावसाळ्यात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

डेंग्यू Dengue, मलेरिया Malaria आदी रोगाचा या कॉलनीत उद्रेक होत आहे. अनेक नागरिकांच्या कुटुंबातील सदस्य डेंग्यूने ग्रस्त झाले आहेत, यावर महानगरपालिका आणि महापौर काहीच कार्यवाही करत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. तात्काळ महानगरपालिकेने कचरा डेपो शहराबाहेर हलवावा, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा या कचरा डेपोला टाळे ठोकण्याचा इशारा दिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

moravala Recipe: ‪आता घरच्या घरीच बनवा मोरावळा

SCROLL FOR NEXT