jayant patil
jayant patil  saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil ED Notice: जयंत पाटलांची ईडी नोटीशीवर प्रतिक्रिया; म्हणाले, काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता आणि ईडीने...

Ruchika Jadhav

Political News: आज संपूर्ण राज्याचे लक्ष सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे असताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का बसलाय. जयंत पाटील यांना ईडीने नोटीस बजावली असून सोमवारी चौकशीला हजार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीच्या नोटीशीनंतर आता जयंत पाटील यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

काल माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यात ईडीने (ED) मला नोटीस पाठवली. संध्याकाळी पाच वाजता सही झाली सहा वाजता ती नोटीस माझ्या घरी आली. त्या नोटीसमध्ये काही कारण सांगितलेलं नाही. पण त्याचा फाईल नंबर काढून बघितला तर असं दिसतंय की आयएफएससी नावाची कुठली तरी संस्था आहे आणि त्या संबंधात काही केस आहेत.

या केसशी माझा आयुष्यात कधी संबंध आला नाही. त्यांच्या दारातही मी कधी गेलो नाही कोणाशी कधी काही बोललो नाही. त्यामुळे माझा त्याच्याशी काहीच संबंध नाही. पण तरी आता बोलावले म्हटल्यावर जावेच लागेल. जी चौकशी होईल त्याला मी सामोरे जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

प्रकरण नेमकं काय?

जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. मात्र, नोटीस पाठवल्याच्या वृत्तावर जयंत पाटील यांनी मात्र अद्याप अशी कोणती नोटी मिळाली नसल्याचं स्प्ष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Helicopter Crash Video: हवेत गिरट्या घातल्या; हेलकावे खाल्ले अन् क्षणात कोसळलं.. सुषमा अंधारेंचं हेलिकॉप्टर क्रॅश; थरारक VIDEO

Dark Circles Removal : डोळ्यांवरील डार्कसर्कल १० मिनीटांत होतील गायब

Maharashtra Election: राज्यातील १३ जागांवर ठाकरे गटविरुद्ध शिवसेना,तर १५ जागेवर काँग्रेसची भाजपशी लढत

Chanakya Niti: यश प्राप्त करायचंय? चाणक्याची ही रणनिती लक्षात ठेवा

Amitabh Bachchan: कोस्टल रोड, अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट; भाजप अन् आदित्य ठाकरेंमध्ये रंगलं ट्विट वॉर

SCROLL FOR NEXT