Nashik Ganesh Visarjan Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Ganesh Visarjan: नाशिकच्या गणेश विसर्जनाला गालबोट; गोदावरीत २ तर वालदेवी धरणात ३ जण बुडाले

Nashik Ganesh Visarjan: गणेश विसर्जन मिरवणुकीला दुर्घटनांचं गालबोट लागलंय.

Bharat Jadhav

(तबरेज शेख)

Ganesh Visarjan :

पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत नाशिककारांनी गणपती बाप्पाला निरोप दिला. परंतु या विसर्जन मिरवणुकीला दुर्घटनांचं गालबोट लागलंय. गणपतीचं विसर्जन करताना गोदावरी नदीमध्ये दोन जण बुडाले आहेत. तर वालदेव धरणात तीन बुडल्यांची घटना घडलीय. दरम्यान पालिकेचे जीवरक्षक कर्मचारी यांच्याकडून शोध सुरू आहे. अद्याप त्यांचा शोध लागला नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, वालदेवी धरणात २ महाविद्यालयीन युवकासह एक विवाहित तरुण बुडाल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest News)

नवव्या दिवशीच्या गणपती बाप्पाला निरोप देताना जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील एक युवक पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. शिरवाडे वणीगावाजवळील पाचोरे वणी येथील नेत्रावती नदीत काल सायंकाळी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच चांदोरी व पिंपळगाव अग्निशमन दलाच्या जवानांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेतला जात होता, मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने युवकाचा शोध लागला नाही.दरम्यान भद्रकाली परिसरात मिरवणूक चालू असताना अचानक दोन तरुणांची हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे.

रायगडच्या गणेश विसर्जनात विघ्न

गणपती विसर्जनासाठी गेलेले चार गणेशभक्त उल्हास नदीत वाहून गेल्याची घटना आज घडली. घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. रायगडच्या कर्जत येथील उल्हास नदीत चार गणेशभक्त विसर्जनासाठी गेले होते. या गणेशभक्तांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने चार जण वाहून गेल्याची घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT