Yeola Vidhan Sabha Saam tv
महाराष्ट्र

Yeola Vidhan Sabha : येवल्यात ठाकरे गटाची बंडखोरी; जिल्हाप्रमुख कुणाल दराडेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Nashik News : समर्थकांच्या आग्रहाला मान देत कुणाल दराडे यांनी येवला- लासलगाव मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
येवला (नाशिक)
: येवला- लासलगाव मतदारसंघात ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांना पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने ठाकरे गटातून बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे येवला मतदारसंघात देखील तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी समर्थकांनी तुम्ही उमेदवारी अर्ज भरा; असा आग्रह केला असता कुणाल दराडे व परिवार भावुक झाल्याचे दिसून आले. समर्थकांच्या आग्रहाला मान देत कुणाल दराडे यांनी येवला- लासलगाव मतदार संघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्थात दराडे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. 

महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कुणाल दराडे समर्थक नाराज असल्याने कुणालभाऊ तुम्हीच येवल्यातून उमेदवारी करा; अशी आग्रहाची विनंती समर्थकांकडून करण्यात आली होती. यानंतर दराडे यांनी ठाकरे गटातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : आज राज्यभरात ११ दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यात येणार

Healthy Rice : मधुमेहापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत 'हे' ५ तांदळाचे प्रकार करतील अनेक आजारांवर मात

48 तासांचा अल्टिमेटम अन् आता ज्ञानेश कुमारांना हटवण्यासाठी इंडिया आघाडी मोठं पाऊल उचलणार

वर्धा हादरलं! मदतीच्या बहाण्याने फसवलं; रेल्वे स्थानकावर तरुणीवर सामूहिक अत्याचार

SBI ATM Rules: ऐकलं का! पुढील महिन्यापासून ATM मधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार; जाणून घ्या किती आकारला जाणार चार्ज

SCROLL FOR NEXT