अक्षय शिंदे
जालना : राजकारणात काहीही होऊ शकतं. आम्ही महायुतीकडून आशावादी आहोत की आम्हाला एबी फॉर्म मिळाला पाहिजे. एबी फॉर्म मिळाला नाही तरी उमेदवारी निश्चित राहील. यामुळे सध्या वेट अँड वॉच असून ५ तारखेनंतर खरा लढा सुरु होईल; अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली.
भास्कर दानवे यांनी एक अपक्ष तर दुसरा उमेदवारी अर्ज भाजपकडून भरला आहे. भास्कर दानवे जालना (Jalna) विधानसभेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र महायुतीने जालना विधानसभेची उमेदवारी अर्जुन खोतकर यांना जाहीर केली. त्यामुळे भास्कर दानवे समर्थक नाराज दिसत असून भास्कर दानवे बंडखोरीच्या (BJP) तयारीत आहेत. यामुळे जालना विधानसभा निवडणुकीत कशी लढत होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सध्या वेट अँड वॉचची भूमिका आहे. मात्र ५ तारखेनंतर खरा लढा सुरू होईल; असं सांगत भास्कर दानवे म्हणालेत कि एबी फॉर्म आला तर जालन्यात मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे संकेत भास्कर दानवे यांनी दिले. राज्यात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होत असून जालना काही वेगळा नाही. या ठिकाणी देखील मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.