डेल्टा व्हेरिअंटमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ - Saam Tv
महाराष्ट्र

डेल्टा व्हेरिअंटमुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ

जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यानं खळबळ उडाली आहे. नुकतेच कुठं निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा व्हेरिएंटचे 30 रूग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे

अभिजित सोनावणे

नाशिक : जिल्ह्यात Nashik District डेल्टा व्हेरिएंटचा Delta Variant शिरकाव झाल्यानं खळबळ उडाली आहे. नुकतेच कुठं निर्बंध शिथिल होऊन जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच डेल्टा व्हेरिएंटचे 30 रूग्ण आढळून आल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. Nashik worried due to Delta Variant

जगामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या Corona डेल्टा व्हेरिएंटचे 30 रूग्ण नाशिक जिल्ह्यात आढळल्यानं नाशिककरांची चिंता वाढली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आढळून आलेल्या 30 रुग्णांपैकी 2 शहरी City भागातील तर 28 रूग्ण हे ग्रामीण Rural भागातील आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातल्या आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

जुलै July महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून विषाणू संशोधन NIV संस्थेकडे पाठण्यात आलेल्या एकूण 155 सॅम्पलपैकी 30 सॅम्पल हे डेल्टा व्हेरिएंटचे आढळून आले आहेत. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसून आली आहेत. या रुग्णांची प्रकृतीही आता ठीक असून त्यांच्यावर आरोग्य यंत्रणांचं संपूर्ण लक्ष आहे. तर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी आता आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे.Nashik worried due to Delta Variant

नाशिकमध्ये सापडलेला डेल्टा व्हेरिएंट हा डेल्टा प्लस व्हेरिएंटइतका धोकादायक नसला, तरी या व्हेरिएंटचा प्रसार वेगानं होतो, लसीचा एकही डोस न घेतलेल्या व्यक्तींना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे एकीकडे निर्बंध शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू असतांना दुसरीकडे डेल्टा व्हेरिएंटच्या शिरकावामुळे प्रशासन सतर्क झालं आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे जिल्ह्यात पुन्हा लगेचचं निर्बंध कडक करण्याची शक्यता कमी असली, तरी नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

Pune News: पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, माथेफिरू तरुणाला अटक; उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Palghar : पालघरमधील एमआयडीसीत कंपनीला भीषण आग | VIDEO

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Maggi History: मॅगीचा शोध कोणी लावला?

SCROLL FOR NEXT