Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News : "तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात..." जादूटोण्याच्या नावाखाली महिलेवर बलात्कार, नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik Nifad Blackmagic News : नाशिकच्या निफाडमध्ये भोंदू बाबाने जादूटोण्याची भीती दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच तिच्याकडून ५० लाख उकळले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Alisha Khedekar

निफाडमध्ये भोंदू बाबाने जादूटोण्याची भीती दाखवत महिलेवर अत्याचार केला

पीडितेकडून तब्बल ५० लाख रुपये उकळण्यात आले

आरोपी गणेश जगतापला पोलिसांनी अटक केली असून साथीदारांची चौकशी सुरू

अंधश्रद्धेच्या नावाखाली अत्याचार वाढत असल्याने नागरिकांमध्ये संताप

नाशिक मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जादूटोण्याची भीती दाखवत एका भोंदू बाबाने महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. धक्कदायक म्हणजे याशिवाय या पीडित महिलेकडून ५० लाख उकळण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश जगताप या भोंदू बाबाचे नाव असून सदर घटना नाशिक मधील निफाडमध्ये घडली आहे. आरोपी हा स्वतःला भोंदू बाबा म्हणवून घेतो. त्याने महिलेला "तू मला आवडतेस, तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो," असे सांगून तिच्यावर मानसिक दबाव आणला. यानंतर त्याने एका पुस्तकात महिलेच्या पती आणि मुलांची नावे लिहिली आणि धमकावले की, "माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल."

या जादूटोण्याच्या भीतीने घाबरलेल्या महिलेने आरोपीच्या सांगण्यानुसार अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले. याच दरम्यान, आरोपीने महिलेकडून ५० लाख रुपये उकळले आणि आर्थिक फसवणूक केली. यानंतर शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठले.

पीडित महिलेने पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणाची तक्रार नोंदवली असून पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गणेश जगताप याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असून, त्याच्या साथीदारांचीही चौकशी सुरू आहे. महिलेने तक्रार दिल्यानंतर उघड झालेल्या या घटनेने स्थानिक भागात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाने होणाऱ्या अत्याचारांवर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोयगाव तालुक्यात उशिरा येणाऱ्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी केले टाळेबंद

Mahaharashtra Politics : एकाच वेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; दोन शिलेदारांचा भाजपमध्ये प्रवेश

Bigg Boss 19: 'तू खोटे बोलतेस...' सलमान खाननंतर रोहित शेट्टीने केली तान्या मित्तलची पोलखोल

Margashirsha Lakshmi Puja: मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे?

Jalna Crime: वहिनीसोबतच्या प्रेमासाठी रक्ताचं नातं केलं परकं; कट आखत परमेश्वरला संपवलं

SCROLL FOR NEXT