nashik crime AI Photo
महाराष्ट्र

Nashik News: कोयता, कुऱ्हाड अन् रक्ताच्या थारोळ्या; भावकीच्या वादातून दोन गटात राडा, एकाचा मृत्यू, १३ जण जखमी

Nashik group fight investigation: दातली गावात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. कोयते, कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला होता.

Bhagyashree Kamble

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. कोयते, कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर १३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

नाशिकच्या सिल्लोड तालुक्यातील दातली या गावात शुक्रवारी दोन गटात तुफान राडा झाला होता. दोन्ही गटाने एकमेकांवर हल्ला करण्यासाठी कोयता आणि कुऱ्हाडी या धारदार शस्त्रांनी वापर केला होता. या हल्ल्यात सागर मारूती भाबड याला सुरूवातील गाडीनं चिरडलं नंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहे. यात सागरचा जागीच मृत्यू झाला.

तर, अन्य १३ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यातील ६ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर पंचनामा करत त्यांनी तातडीने जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली आहे. हे हत्याकांड भाउबंदकीच्या वादातून घडली असल्याची माहिती समोर आली आहे. पण कोयता आणि कुऱ्हाडीचा वापर करत झालेल्या रक्तरंजित हल्ल्यामुळे दातली गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT