Nashik tryambakeshwar temple trustee arrested Saam TV Marathi
महाराष्ट्र

मोठी बातमी! महादेव दर्शनाचा काळाबाजार, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला अटक

Nashik tryambakeshwar temple trustee arrested : - त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना अटक करण्यात आली आहे. महादेवाच्या दर्शनाच्या काळाबाजार प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीसांनी ही कारवाई केली.

Namdeo Kumbhar

Nashik tryambakeshwar temple trustee arrested : नाशिकमधील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महादेवाच्या दर्शनाचा काळाबाजार केल्याप्रकरणी त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांना पोलिसांनी अटक केली आहे. मंदिर प्रशासनातील एका जबाबदार पदावरील व्यक्तीलाच अटक झाल्याने नाशिक आणि संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पुरुषोत्तम कडलग हे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडे पक्षाचे नाशिकमधील महत्त्वाचे पद असल्याची माहिती समोर आली आहे

काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाकडून व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली ३ हजार रुपये उकळण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दोन दिवसांपूर्वीच पुरुषोत्तम कडलग यांचा पुतण्या याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना या काळाबाजारामध्ये विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचाही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीने पावले उचलत कडलग यांना बेड्या ठोकल्या.

मंदिर संस्थानच्या विश्वस्तानेच अशा प्रकारे दर्शनाचा बाजार मांडल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. मात्र, आता थेट विश्वस्तावरच कारवाई झाल्याने मंदिर प्रशासनातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT