Trimbakeshwar darshan scam Saam TV
महाराष्ट्र

Darshan Scam : भाविकांची लूट! त्र्यंबकेश्वरमध्ये ३ हजारात १० मिनिटात दर्शन ? दर्शन स्कॅमचं 'रेटकार्ड' उघड?

Trimbakeshwar darshan scam : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जलद दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून हजारो रुपये उकळले जात असल्याचा आरोप समोर आला आहे.

Namdeo Kumbhar

Trimbakeshwar temple darshan online pass : नाशिकचं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर.. जिथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. पण सध्या हे तीर्थक्षेत्र दर्शनासाठी नाही, तर भाविकांच्या लुटीसाठी चर्चेत आलंय... त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन कमीत कमी वेळेत व्हावे, यासाठी 200 रुपयांचा ऑनलाईन पास काढून विशेष रांगेत दर्शनाची सोय करण्यात आलीय... मात्र या सुविधेतही त्रुटी असल्यानं भाविकांची डोकेदुखी वाढलीय.

दरम्यान ऑनलाईन पास सुविधेत होणाऱ्या गैरसोयीमुळे मंदिराभोवती फिरणारे दलाल भाविकांची लूट कशी करतायत आणि दर्शनासाठी तीन तास लाईनमध्ये उभं राहण्याचा वेळ नसणारे भाविक 'दर्शन स्कीम' ला कसे बळी पडतात... पाहूयात...

त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज 15 ते 25 हजार भाविक दर्शनासाठी येतात... देणगी दर्शनाच्या पासची मर्यादा 3 हजारांपर्यंत म्हणजे 20 टक्के आहे... त्यामुळे दलाल मंदिरापर्यंत पोहचवण्यासाठी 200 रुपये घेतात.. पास काढून दर्शनासाठी पाठविण्याचे प्रतिव्यक्ती 400 ते 450 रुपये घेतात... दहा मिनटात दर्शन घेण्यासाठी सोमवार ते शुक्रवारी एक हजार ते पंधराशे रुपये घेतात... शनिवारी आणि रविवारी हाच दर अडीज ते तीन हजार रुपयांपर्यंत पोहचतो...

खरे तर ही व्यवस्था महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पटकन दर्शन घेता यावे, यासाठी निर्माण केलेली आहे. अधिकृत पेड दर्शनाचा पास घेणाऱ्या भाविकांना मर्यादित ठेवून या व्यवस्थेने अनधिकृतपणे पैसे कमावले जातायत... त्यात पेड दर्शनाचे पास काउंटर कुठे आहे... याविषयी माहिती नसल्यानं अनाधिकृत पद्धतीनं पासची विक्री केली जातेय... त्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात कायद्याला उल्लघनं करून देणगी प्रवेशिका दिल्या जातातय, असा आरोप खुद्द माजी विश्वस्तांनी केलाय...

दरम्यान अनाधिकृत देणगी प्रवेशिकेचा मुद्दा त्र्यंबकेश्वरमध्ये चर्चेत नाही.. तर मंदिर परिसरात होणाऱ्या मारहाणीच्या घटनाही अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात... त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसोबत त्याच्या खिशाला कात्री लागू नये, दलालांकडून होणारी लूट थांबवी, यासाठी मंदिर प्रशासन भविष्यात काय निर्णय घेतं? हे पाहणं महत्त्वाचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानचं TCS मधून निलंबन

Sai Tamhankar: बोल्ड बिंदास ब्यूटीफुल सई ताम्हणकरचा ग्लॅमरस लूक, निळ्या साडीत केलं खास फोटोशूट

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला महिलांनी नेसा पिवळ्या रंगाची साडी, लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन्स

EPFO 3.0: ATM मधून ५ मिनिटांत काढा PFचे पैसे ; कशी असेल प्रोसेस? वाचा संपूर्ण माहिती

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा आमदार होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT