Trimbakeshwar Temple Saam tv
महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple: त्र्यंबकेश्वर चरणी भरभरून दान; दोन महिन्यात तब्बल ५ कोटीहून अधिकची देणगी

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर चरणी भरभरून दान; दोन महिन्यात तब्बल ५ कोटीहून अधिकची देणगी

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : श्रावण व अधिक मास यावर्षी जोडून आल्याने देवदर्शनासाठी जाण्याचा भाविकांचा ओघ अधिक होता. यात (Trimbakeshwar) त्रंबकेश्वरला देखील भाविकांची मोठी गर्दी या दोन महिन्यात झालेली पाहावयास मिळाली. येथे आलेल्या भाविकांनी देणगी स्वरूपात मोठे दान केले असून या दोन (Nashik) महिन्यात तब्बल ५ कोटी ३ लाखाची देणगी प्राप्त झाली आहे. (Breaking Marathi News)

अधिक श्रावण व श्रावण मास असा योग्य यंदा जुडून आला होता. अधिक महिना हा पवित्र मानला जातो. यामुळे या अधिक श्रावण मासात देवस्थानाला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. शिवाय श्रावण महिना आल्याने देखील या दोन महिन्यात भाविकांची गर्दी लाखात घेता त्रंबकेश्वर देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी दर्शनाची वेळ दीड तासाने वाढवल्याने अनेक भाविकांनी येथे दर्शनाचा लाभ घेता आला. शिवाय विश्वस्त मंडळाच्या नियोजनामुळे भाविकांची उत्तम व्यवस्था देखील येथे राखली गेली. 

दोन महिन्यात भरभरून दान 

श्रावण आणि अधिक मासात भाविकांनी त्र्यंबकेश्वर चरणी भरभरून दान दिले आहे. २५ लाख भाविक श्रावणात त्र्यंबकेश्वरच्या चरणी लीन झाले असून श्रावण व अधिक श्रावण अशा दोन महिन्यात त्र्यंबकेश्वर चरणी तब्बल ५ कोटी ३ लाखांची देणगी आली आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर देवस्थानला विक्रमी उत्पन्न मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

School Holiday : मुसळधार पावसाचा अलर्ट! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूरमधील शाळांना उद्या सुट्टी

SCROLL FOR NEXT