नाशिक: सुरगाणा तालुक्यातील शेवटचे टोक गुजरात सीमेपासून अवघ्या दहा ते वीस फुटांवर असलेले चंद्रपूरची (Nashik) बागुल वस्ती या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी मोतीराम बागुल यांचे आकस्मित निधन झाले. त्या दिवशी पावसाची संततधार सुरु होती. सुरगाणाहून शवविच्छेदन करुन मृतदेह गावी आणल्यावर धो-धो पावसात अंतिम संस्कार करायचे कसे? हा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. शवविच्छेदन झालेले प्रेत घरी ठेवता येत नव्हते. अखेर काट्या-कुट्या तुडवीत, भरपावसात स्मशानाकडं चल माझ्या प्रेता असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. (Nashik Latest News)
प्रत्यक्ष अडचणींचा सामना करतेवेळी मयतांच्या नातेवाईकांना खुप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. स्मशानात भूमीपर्यंत (cemetery) जाण्यासाठी रस्ता नसल्याने खांदेकरी यांना प्रेत घेऊन चालता येत नव्हते. चिखलातून, भातशेती मधून, बांधावरुन प्रेत घेऊन जावे लागले. कसेबसे हालअपेष्टा सहन करीत स्मशानात पोहचल्यावर तेथे उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागत असल्यानं त्यातच पाऊस पण असल्यानं मीठ तसेच पेट्रोल अथवा डिझेलचा वापर करुनही प्रेत पेटत नव्हते. अखेर सागवान पानाची पलान शिवून चितेवर ठेवत अग्नी डाग देण्यात आला. त्यामुळे चिता पेटविण्यासाठी सागवान पानांचा आधार घ्यावा लागला. हेच आदिवासींच्या (Tribal) नशीबी वाईट दुर्दैव आहे.
मेल्यावरही प्रेताची अवहेलना, विटंबना उघड्या डोळ्यांनी पहावी लागते. तालुक्यात ठराविक गावातच स्मशानभूमी शेड आहेत. अनेक गावांमध्ये उघड्यावरच अंतिम संस्कार केले जातात. चंद्रपूर गावची लोकसंख्या तेराशे ते दीड हजारांच्या आसपास आहे. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीवर तात्काळ शेड उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केलीय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.